Uddhav Thackeray : हंबरडा मोर्चातून ठाकरेंची मोठी मागणी, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 3 लाखांपैकी….
छत्रपती संभाजीनगरमधील हंबरडा मोर्चात उद्धव ठाकरे यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. खरडून गेलेल्या जमिनीसाठी सरकारने जाहीर केलेल्या तीन-साडेतीन लाखांपैकी एक लाख रुपये दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
छत्रपती संभाजीनगरमधील हंबरडा मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी तातडीच्या मदतीची मागणी केली. खरडून गेलेल्या जमिनीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत मिळावी, असे आव्हान त्यांनी दिले. ठाकरे यांनी स्पष्ट केले की, सरकारने जाहीर केलेल्या प्रति हेक्टर तीन ते साडेतीन लाख रुपयांच्या मनरेगा अंतर्गत मदतीपैकी, किमान एक लाख रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले की, “मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने आव्हान देतो आहे की दिवाळीपूर्वी त्या तीन लाखातले एक लाख माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाका!” असे ते म्हणाले. मनरेगातून साडेतीन लाख रुपये कसे देणार, कसे द्यायचे तसे द्या, देऊन दाखवाच, पण एक लाख रुपये दिवाळीपूर्वी माझ्या शेतकऱ्याच्या अकाऊंटमध्ये पहिले टाका, या मागणीमुळे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.
