Uddhav Thackeray : मोदी माझे काही दुश्मन नाहीत, तर… उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांशी असलेलं वैर नाकारलं!
या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी असलेले कोणतेही वैर नाकारले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत पुरवण्याची त्यांनी मागणी केली आहे. राज ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीचाही त्यांनी उल्लेख केला आहे. भूतकाळातील आश्वासनांच्या पूर्ततेबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
धाराशिवमधील विविध कार्यकर्त्यांनी आज ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे उपस्थित होते. या पक्षप्रवेशांनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपले कोणतेही वैर नसल्याचे स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीबाबत त्यांनी तातडीने पंचनामे करून मदत करण्याची मागणी केली आहे. सर्वसामान्य माणूस क्रांती करतो असेही ते म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी सरकारच्या भूतकाळातील आश्वासनांचा उल्लेख करत त्यांच्या पूर्ततेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. इतकंच नाहीतर राज ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीचाही उल्लेख उद्धव ठाकरेंनी यावेळी केला आहे.
Published on: Sep 16, 2025 05:23 PM
