Uddhav Thackeray : दोन्ही बंधू एकत्र, जाहीरपणे ठाकरेंकडून तोंडभरून कौतुक; म्हणाले, राजचं कर्तृत्व अन् अप्रतिम….

Uddhav Thackeray : दोन्ही बंधू एकत्र, जाहीरपणे ठाकरेंकडून तोंडभरून कौतुक; म्हणाले, राजचं कर्तृत्व अन् अप्रतिम….

| Updated on: Jul 05, 2025 | 1:08 PM

'अनेक बुवा महाराज बिझी आहेत. कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतं. कोण गावी जाऊन अंगारे धुपारे करत आहेत. त्या सर्वांना सांगतो. या भोंदूपणा विरोधात माझ्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांचे वारसदार म्हणून आम्ही उभे ठाकलो आहोत', असं ठाकरे म्हणाले.

‘बऱ्याच वर्षांनंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली. पंचायत अशी त्यांनी मला सन्मानिय उद्धव ठाकरे म्हटलं. साहजिकच आहे, त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे. म्हणून मी भाषणाची सुरुवात करताना सन्मानीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू माता भगिनींनो. अप्रतिम मांडणी राजने केलीय’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाषणाची सुरूवात करताना राज ठाकरेंचं कौतुक केलं.

पुढे ते म्हणाले, आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यावर सर्वांचं लक्ष भाषणाकडे आहे. पण भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं याकडे सर्वांचं लक्ष आहे. मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून मराठी माणसाची वज्रमूठ दाखवली त्या सर्वांचे आभार मानतो. आमच्या दोघातील अंतरपाट होता तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्ष नाही. एकत्र आलो. एकत्र राहण्यासाठी, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राजकारणात पुन्हा एकत्रितपणे सक्रिय होण्याचे संकेत दिलेत.

Published on: Jul 05, 2025 01:08 PM