Janakrosh Morcha : हातात पैशांच्या बॅगा अन् बनियान… आक्रमक शिवसैनिकांचं शिवाजी पार्कात आंदोलन, मागणी नेमकी काय?
महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसने राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन सुरू केले आहे. बघा नेमके काय केले सत्ताधाऱ्यांवर आरोप?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आज, ११ ऑगस्ट रोजी राज्यभरात ‘जनआक्रोश आंदोलन’ करण्यात येत आहे. महायुती सरकारमधील मंत्र्यांवर झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. हे आंदोलन राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात येत आहे. हे आंदोलन केवळ मुंबईपुरते मर्यादित नसून, महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात शिवसैनिकांकडून जोरदार निदर्शने करण्यात येत असून महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी जनआक्रोश आंदोलन करण्यात आज आलं. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्क परिसरात एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शिवसैनिकांनी बनावट पैशांच्या बॅगा हातात घेतल्या तर काहींच्या हातात बनियन देखील पाहायला मिळाले.
Published on: Aug 11, 2025 02:35 PM
