संजय गायकवाड यांनी राऊत यांची अक्कल काढली, पहा काय म्हणाले…

संजय गायकवाड यांनी राऊत यांची अक्कल काढली, पहा काय म्हणाले…

| Updated on: Mar 26, 2023 | 7:22 AM

एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा स्वातंत्र पक्ष काढावा आणि निदान किमान पाच आमदार तरी निवडून दाखवावेत असं आव्हान राऊत यांनी दिलं होत

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच त्यांनी शिंदे यांना तुम्ही दुसरा पक्ष काढा असा सल्ला दिला. त्यावरून शिवसेनेचे नेते आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला. संजय राऊतांना अक्कल पाहिजे, आमच्याकडे पक्ष असताना दुसरा पक्ष काढण्याची गरज काय असा सवाल केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा स्वातंत्र पक्ष काढावा आणि निदान किमान पाच आमदार तरी निवडून दाखवावेत असं आव्हान राऊत यांनी दिलं होत. त्यानंतर संजय गायकवाड यांनी त्यांना अक्कल पाहिजे. आम्हाला शिवसेनेसारखा पक्ष असताना दुसरा पक्ष काढायची गरज काय? आम्हाला शिवसेना पक्ष आहे, आम्हाला धनुष्यबाण आहे. आमच्याकडे 50 आमदार 13 खासदार आहेत. हजारो माजी आमदार हजारो नगरसेवक आणि लाखो जनता आमच्या सोबत आहेत. पक्ष काढायची गरज तुम्हाला आहे.

Published on: Mar 26, 2023 07:22 AM