आधी मांडीवर बसलेल्या नबाबांना सांभाळा; राऊत यांचे फडणवीस यांना जोरदार उत्तर

आधी मांडीवर बसलेल्या नबाबांना सांभाळा; राऊत यांचे फडणवीस यांना जोरदार उत्तर

| Updated on: Mar 26, 2023 | 3:12 PM

राऊत यांनी आम्हाला फडणवीस यांना उत्तर द्यायची गरज नाही. आमच्यावर बाळासाहेबांचं बारीक लक्ष आहे. आम्ही बाळासाहेबांच्या प्रेरणेच काम करतोय असं म्हटलं आहे

नाशिक : उद्धव ठाकरे यांचे मालेगावमधील ऊर्दु भाषेतील पोस्टर लागल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अली जनाब म्हणत टीका केली होती. त्यानंतर पुन्हा त्यांनी ठाकरे यांना छेडत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना काय उत्तर द्याल असे म्हटलं. त्यांच्या या टीकेला खासदार संजय राऊत यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. राऊत यांनी फडणवीस यांना, आधी तुमच्या मांडीवर बसलेल्या नबाबांना सांभाळा असे खरमरीत उत्तर दिलं आहे.

ऊर्दु बॅनर वरून देवेंद्र फडणवीस यांनी हा जोरदार निशाणा साधताना, अली जनाब हे उद्धव ठाकरे शोभतं का? त्यांना ते भुषणावह वाटतं का? हे त्यांनाच विचारा असं म्हटलं होतं. त्यानंतर राऊत यांनी आम्हाला फडणवीस यांना उत्तर द्यायची गरज नाही. आमच्यावर बाळासाहेबांचं बारीक लक्ष आहे. आम्ही बाळासाहेबांच्या प्रेरणेच काम करतोय. त्यामुळे फडणवीस यांनी तुमच्या मांडीवर बसलेल्या नबाबांना सांभाळा असे म्हटलं आहे.

Published on: Mar 26, 2023 03:12 PM