जे दिवटे निघाले त्यांना मशालीच…; उद्धव ठाकरेंची खरमरीत टीका

जे दिवटे निघाले त्यांना मशालीच…; उद्धव ठाकरेंची खरमरीत टीका

| Updated on: Nov 20, 2025 | 3:32 PM

उद्धव ठाकरे यांनी शिक्षणातील मूल्यांवर आणि राजकारणातील रेवडी संस्कृतीवर भाष्य केले. "बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला गेले" या टीकेद्वारे त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. शालेय शिक्षणाचे महत्त्व, दप्तराचे ओझे कमी करण्याची गरज आणि आधुनिक तंत्रज्ञानासोबत संस्कारांची जोड यावर त्यांनी भर दिला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण पद्धती, संस्कार आणि सध्याच्या राजकारणावर सडेतोड भाष्य केले आहे. शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी आमदार निधी शिक्षणासाठीच वापरण्याचे आवाहन केले. राजकारणातील “बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला गेले” या लाचारीवर त्यांनी टीका केली. त्यांच्या मते, चांगल्या शिक्षणाच्या अभावामुळे अशी परिस्थिती उद्भवते.

ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांचे आणि त्यांच्या आजोबांचे उदाहरण दिले, ज्यांना शालेय शिक्षण पूर्ण करता आले नाही, पण घरातून मिळालेल्या संस्कारांमुळे त्यांचे शिक्षण थांबले नाही. मुलांवर संस्कार करण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. तसेच, ए फॉर ऍपल सारख्या शिक्षण पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, स्थानिक परिस्थितीनुसार शिक्षण बदलण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी रेवडी वाटपाच्या राजकारणावरही टीका केली, जिथे फुकट कॉम्प्युटर दिले जातात पण त्यात काय भरायचे याचा विचार होत नाही. दप्तराचे ओझे कमी करण्याच्या शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नाचाही त्यांनी उल्लेख केला.

Published on: Nov 20, 2025 03:32 PM