Ashish Shelar : अहो ‘बाता’शिष शेलार… मुंबईची तुंबई होताच ठाकरेंच्या सेनेकडून बॅनरबाजी, नेमकं काय म्हटलंय?

Ashish Shelar : अहो ‘बाता’शिष शेलार… मुंबईची तुंबई होताच ठाकरेंच्या सेनेकडून बॅनरबाजी, नेमकं काय म्हटलंय?

| Updated on: May 28, 2025 | 11:49 AM

मुंबईच्या बांद्रा परिसर येथे सध्या एका बॅनरची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. हे बॅनर भाजपचे नेते मंत्री आशिष शेलार यांच्याविरोधात असून ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे बॅनर लावण्यात आलं आहे.

मुंबईच्या बांद्रा परिसरामध्ये भाजप नेते आशिष शेलार यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. बॅनरवर आशिष शेलार यांचा बाताशिष शेलार असा उल्लेख करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. ‘अहो बाताशिष शेलार मुंबईकरांनी सत्तेचं दार उघडून दिलं नव्हतं… तुम्ही लाथाडून आत शिरलात’, असं या बॅनरवर खोचकपणे म्हटल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर आता पहिल्याच पावसात मुंबईकरांचा पाय गटारात आणि तुमच्या तोंड माईकमध्ये असा आशयही या बॅनरवर दिसतोय. महाविकास आघाडीच्या काळात मुंबई महापालिकेने पावसाळी कामांसंदर्भात हाती घेतलेल्या प्रकल्पाची श्वेतपत्रिका सादर करावी, अशी मागणी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी नगरविकास विभागाकडे केली होती. याशिवाय, मिठी नदीच्या परिसरात केलेल्या गाळ काढण्याच्या कामाचा आढावा देण्याचीही त्यांनी मागणी केली. यानंतर त्यांच्या विरोधातील बॅनर शिवसेना नेता अखिल चित्रे यांच्याकडून लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले. तर या बॅनरची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

Published on: May 28, 2025 11:49 AM