ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, चंद्रशेखर बावनकुळेंचं ठाकरेंना आव्हान
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात असं आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांनी दिलें आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचं वातावरण सध्या खूपच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वार-पलटवार सुरुच आहेत. अशातच आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांचे फोटो आणि सभा घेऊन 18 खासदार जिंकले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकून दाखवाव्यात नाही तर ठाकरेंनी राजकीय संन्यास घ्यावा असं आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना दिलं आहे.
Published on: Apr 25, 2024 03:22 PM
