Uddhav Thackeray : ‘हिंदूत्व सोडलं का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray : ‘हिंदूत्व सोडलं का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

| Updated on: Apr 03, 2025 | 1:26 PM

'३७० कलम हटवलं. किती काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन झालं. त्यांना किती त्यांच्या जमिनी दिल्या. काश्मिर पंडितांना त्यांच्या घरी का जाता येत नाही, यावर त्यांनी उत्तर द्यावं.', उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

‘देशातील इतिहासात मुस्लिमांचा कळवळा घेणारी भाषण भाजपने केली. अमित शाहपासून सर्वांनी केली. जिनांनाही लाजवेल ही भाषणे होती. हे मुस्लिमांच्या बाजूने आहेत की नाही. मग हिंदुत्वाचं काय झालं. हिंदूत्व सोडलं का?’, असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. आज उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली यामध्ये हिंदुत्व या मुद्यावर बोलताना भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘बाळासाहेबांनी मुस्लिमांना इज्तेमा करण्याची परवानगी दिली होती. तीच जागा व्यापाऱ्यांसाठी उद्योगपतीच्या खिशात घातली. किरेन रिजिजूपासून सर्व खाली मान घालून बघत होते. हे काय चाललंय. मुस्लिमांच्या हिताचं हे बिल आहे का. असेल तर मग हिंदुत्व तुम्ही सोडलं की आम्ही सोडलंय.’, असा प्रतिसवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला केला. यावेळी त्यांनी ३७० कलमावर भाष्य केलं. ‘वक्फ बोर्डातील काही सुधारणा चांगल्या आहेत. पण यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे. गरीब मुस्लिमांबाबत यांच काय धोरण आहे. ३७० कलमाला आम्ही पाठिंबा दिलो होता. काश्मीरमधील अनेक निर्वासित इकडे तिकडे फिरत होते. त्यांना शिवसेना प्रमुखांनी आसरा दिला.’, असं ठाकरेंनी म्हटलंय.

Published on: Apr 03, 2025 01:26 PM