MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 9 October 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 9 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 6:49 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यातील वाद मागील काही महिन्यांत कमालीचा वाढला आहे. त्यानंतर आता चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने हे दोघेही तब्बल 16 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आले.

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात विस्तवही जात नाही. संधी मिळेल तेव्हा राणे उद्धव ठाकरेंवर टीका करत असतात. मात्र, आज तब्बल 12 वर्षानंतर एका मंचावर आल्यावर राणेंनी चक्क उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी देवदेवतांना गाऱ्हाणं घातलं. उद्धव ठाकरेंच्या मागची ईडापिडा दूर करण्याचं साकडंही त्यांनी घातलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज चिपी विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं. तब्बल 12 वर्षानंतर राणे आणि ठाकरे एका मंचावर आले. त्या आधी कालच राणेंनी चिपीचं श्रेय आपलं असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राणे आज काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यावेळी राणेंनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी विमानतळाचं श्रेय आपलंच असल्याचंही सांगितलं. तसेच राणेंनी चक्क मुख्यमंत्र्यांसाठी गाऱ्हाणंही घातलं. मुख्यमंत्री सिंधुदुर्गात विमान वाहतूक सुरू करायला आले. मी इथल्या देव देवतांना गाऱ्हाणे घालेन, या सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य दे. त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. ईडापिडा असतील तर दूर कर. अशी मी प्रार्थना करतो, असं राणे म्हणाले.