उद्धव ठाकरेंची उर्जा विभागासोबत थकबाकी संदर्भात आज बैठक

| Updated on: Sep 14, 2021 | 12:37 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ऊर्जा विभागासोबत बैठक घेणार आहेत. ऊर्जा विभागाची थकबाकी मोठी आहे. राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाची थकबाकी 60 हजार कोटींच्या वर गेली आहे.

Follow us on

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ऊर्जा विभागासोबत बैठक घेणार आहेत. ऊर्जा विभागाची थकबाकी मोठी आहे. राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाची थकबाकी 60 हजार कोटींच्या वर गेली आहे. याविषयी उद्धव ठाकरे हे ऊर्जा मंत्री नितीन राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह एकूण12 मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. राज्य सरकारच्या उत्पन्नाचा प्रमुख सोर्स म्हणून ऊर्जा विभागाकडं पाहिलं जातं. कोरोना संकटाच्या काळात थकबाकीचं प्रमाण वाढलेलं आहे. ऊर्जा विभागाची थकबाकी कशी वसूल करायची, प्रीपेड मीटर आणले जाणार का यावर देखील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा होणार आहे. राज्य सरकार या बैठकीत काय निर्णय घेणार याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.