केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पुन्हा एकदा बारामतीच्या दौऱ्यावर, या अपडेटसह पहा सुपरफास्ट 50 न्यूज
पुण्यात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. तर अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची धावपळ उडाली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यात पोहचले आहेत. पुण्यात पोहल्यानंतर ते मनसे नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तर राज ठाकरे हे पुण्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पुन्हा एकदा बारामतीच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसांत होईल. दरम्यान पुण्यात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. तर अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची धावपळ उडाली. दरम्यान आज आणि उद्या पुन्हा पुण्यात पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अमरावतीत लम्पी नियंत्रणासाठी 40 डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली आहे. तर पुण्यात वर्दीतील माया पहायला मिळाली. येथे रडणाऱ्या बाळाला वर्दीतील महिला पोलीसांनी खेळवल्याचे पहायला मिळत आहे.
Published on: Oct 06, 2022 05:45 PM
