Rain Update | लातूर ते सोलापूर, वादळी वाऱ्यानं सगळं संपवलं, शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात!
राज्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका अनेक भागांना बसत असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
राज्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका अनेक भागांना बसत असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून शासनाकडून आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. केळी हे नगदी पीक असल्याने या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. लातूर, अहमदपूर, चाकूर, निलंगा आणि औसा या तालुक्यांमध्ये जोरदार वारे आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ग्रामीण भागांमध्ये वादळी वाऱ्यामुळे वीजवाहिन्या आणि विद्युत यंत्रणांचे नुकसान झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
हवामानातील अचानक बदलामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेतला जात आहे.
