Usain Bolt birthday : वेगाचा बादशाह, 8 सुवर्णपदकांचा मानकरी, विश्वविक्रमी धाव

Usain Bolt birthday : वेगाचा बादशाह, 8 सुवर्णपदकांचा मानकरी, विश्वविक्रमी धाव

| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 9:06 AM

Usain Bolt birthday : ऑलिम्पिक विजेता धावपटू उसेन बोल्टचा आज जन्मदिवस. उसेन बोल्ट आतापर्यंत 8 वेळा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. 100 मी, 200 मी, आणि 4x100 मी रिले स्पर्धेत त्याने विश्वविक्रम केला. जमैकाच्या ट्रेलानी शहरातील ग्रामीण भागात त्याचा जन्म झाला.

ऑलिम्पिक विजेता धावपटू उसेन बोल्टचा आज जन्मदिवस. उसेन बोल्ट आतापर्यंत 8 वेळा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. 100 मी, 200 मी, आणि 4×100 मी रिले स्पर्धेत त्याने विश्वविक्रम केला. जमैकाच्या ट्रेलानी शहरातील ग्रामीण भागात त्याचा जन्म झाला. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शाळेत उसेन हा एकमेव जलद धावपटू होता. त्याला क्रिकेटच्या कोचने ट्रॅक अँड फिल्डच्या स्पर्धेत भाग घेण्याचा आग्रह केला. उसेन बोल्टने मुलीचे नाव “ऑलिम्पिया लाईटनिंग बोल्ट” ठेवले. उसनेच्या पत्नीने हे नाव ठेवल्याचे उसेनने एका मुलाखतीत सांगितले. ‘लाईटनिंग’ हे नाव उसेनच्या स्पीडमुळे ठेवल्याचे तिने स्पष्ट केले.