Nanded | ओमीक्रॉनच्या भीतीमुळे नांदेडमध्ये लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी

Nanded | ओमीक्रॉनच्या भीतीमुळे नांदेडमध्ये लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी

| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 5:23 PM

दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या नव्या विषाणुची धास्ती जगासह महाराष्ट्रानं घेतली आहे. नांदेडमध्ये नागरिकांनी पहाटेपासून लसीकरणासाठी रांगा लावल्या आहेत. लस घेण्यासाठी  याआधी लोकांना घरी जाऊन सांगावं लागत होतं, मात्र लोक लसीकरणाला गांभीर्यानं घेत नव्हते.

नांदेड : दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या नव्या विषाणुची धास्ती जगासह महाराष्ट्रानं घेतली आहे. नांदेडमध्ये नागरिकांनी पहाटेपासून लसीकरणासाठी रांगा लावल्या आहेत. लस घेण्यासाठी  याआधी लोकांना घरी जाऊन सांगावं लागत होतं, मात्र लोक लसीकरणाला गांभीर्यानं घेत नव्हते, आता मात्र दक्षिण अफ्रित कोरोना नवा व्हेरिएंट ओमिक्रोन आढल्यानंतर लोकांनी लसीकरणासाठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं. राज्य सरकारकडूनही 100 टक्के लसीकरणावर भर देण्यात येत आहे. राज्य सरकारकडून काही तातडीच्या उपाययोजनाही करण्यात येत आहे. राज्यात आणखी काही निर्बंध लाग्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगाला धडकी भरवली आहे.