Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण; 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवले
Pune Crime Case : वैष्णवी हगवणे प्रकरणी पोलिसांकडून तपासाला वेग आलेला असून आतापर्यंत पोळीसणी 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत.
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. या 19 साक्षीदारांमध्ये वैष्णवीच्या एका मैत्रिणीचा सुद्धा समावेश आहे. सध्या हगवणे कुटुंबातील वैष्णवीची सासू, नणंद आणि नवऱ्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तर सासरा आणि दिराला पोलिस कोठडीत ठेवण्यात आलेलं आहे. या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ हगवणे कुटुंबाकडून करण्यात आला. वैष्णवीच्या मृत्यूने हगवणे कुटुंबाचे अनेक कारनामे समोर आले आहेत.
दरम्यान, पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासात आता तब्बल 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यात वैष्णवीच्या एका मैत्रिणीचा देखील समावेश आहे. हगवणे कुटुंबाकडून छळ सुरू असताना वैष्णवीने आपल्या एका मैत्रिणीशी यासंदर्भात केलेल्या संभाषणाचं फोन रेकॉर्डिंग व्हायरल झालेलं होतं.
Published on: May 30, 2025 02:35 PM
