Rajesh Tope | बोगस लसीकरणाला बळी पडलेल्या लोकांचे अँटीबॉडी तपासून पुन्हा रजिस्टर करत लसीकरण करणार

| Updated on: Jun 30, 2021 | 12:17 PM

मुंबईतील अनेक भागांत बोगस लसीकरणाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. याविषयी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, याबाबत काकणी यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली आहे. साधारणपणे 2 हजार 40 लोकांमध्ये फेक लसीकरण झाले आहे.

Follow us on

मुंबईतील अनेक भागांत बोगस लसीकरणाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. याविषयी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, याबाबत काकणी यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली आहे. साधारणपणे 2 हजार 40 लोकांमध्ये फेक लसीकरण झाले आहे, या प्रकरणी 10 जणांना अटक केली आहे. मग, लसीकरण केले म्हणून प्रमाणपत्र दिलेलं आहे, मग यावर काय? आता सध्या मे च्या दरम्यान ही झालेली घटना आहे . 2040 लोकांचे अँटी बॉडीज टेस्ट करण्याची गरज आहे, त्यांच्या टेस्ट केल्या जातील. ज्यांना लसीकरण करायची गरज आहे, त्यांची यादी केंद्राला पाठवली जाईल.