Pune : शिवतारेंच्या भाचा-भाचीवर मेहुण्यानेच रोखली पिस्तूल अन्.., कुटुंबातील वाद चव्हाट्यावर; नेमकं घडलं काय?

Pune : शिवतारेंच्या भाचा-भाचीवर मेहुण्यानेच रोखली पिस्तूल अन्.., कुटुंबातील वाद चव्हाट्यावर; नेमकं घडलं काय?

| Updated on: May 28, 2025 | 2:05 PM

दिलीप यादव यांच्याकडून आमच्या जिवितास धोका आहे. राजकीय दबावामुळे यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. सातत्याने आमच्यावरती अन्याय होत आहे त्याची दखल पोलिसांकडून घेतली जात नाही. गोळ्या झाडून मारण्याच्या आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. त्यांच्या दबावामुळेच माझ्या आईचा पण हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला.

आमदार विजय शिवतारे यांच्या नातेवाईकावर पिस्तूल रोखल्याची घटना समोर आली आहे. केतकी झेंडे आणि प्रसाद यादव हे आमदार विजय शिवतारे यांचे भाचे आहेत. यांच्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख दिलीप यादव यांनी भांडणात पिस्तूल रोखलं आहे. पुण्यातील सासवड, हडपसर रोडवरील महाराजा लॉन्सवर एका लग्न समारंभात हा प्रकार घडला. या लग्न सोहळ्यात दिलीप यादव आणि त्यांचा मुलगा विनय यादव यांनी आपल्याच पुतण्या आणि पुतणीवर बंदूक रोखली आणि त्यांना धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी शिवतारेंची भाची केतकी झेंडे यांनी फिर्याद दाखल केली तर विनय यादव यांनी मारहाण झाल्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. दिलीप यादव हे आमदार विजय शिवातरे यांचे सख्खे चुलत मेव्हणे असल्याची माहिती आहे. दिलीप यादव यांच्याकडून बंदुकीचा धाक दाखवत आमच्यावर दबाव टाकला जात आहे. यापूर्वी ही त्यांनी आमच्यावर अन्याय केला, असं म्हणत केतकी झेंडे आणि प्रसाद यादव भावा बहिणींचा जिल्हाप्रमुख दिलीप यादव यांच्यावर हा आरोप आहे.

Published on: May 28, 2025 02:05 PM