Nagpur : दारूचा घोट अन् शासकीय फाईल, बारमध्ये बसणारे ‘ते’ 3 अधिकारी कोण? वडेट्टीवारांचा खळबळजनक आरोप काय?

Nagpur : दारूचा घोट अन् शासकीय फाईल, बारमध्ये बसणारे ‘ते’ 3 अधिकारी कोण? वडेट्टीवारांचा खळबळजनक आरोप काय?

| Updated on: Jul 28, 2025 | 1:54 PM

'महाराष्ट्र राज्याला चारित्र्य राहिलं नाही. अधिकारी देखील मोकाट आहेत. त्यांना माहितीये कोण काही करू शकणार नाही? विचारणारं कोणी नाही. हे सगळे भ्रष्टाचारात अखंड बुडाले आहे', ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनीही हल्लाबोल केलाय

नागपूर येथे शासकीय फाईल्स घेऊन तीन व्यक्ती बारमध्ये बसल्याचे समोर आले आहे. नागपुरात असणाऱ्या मनीष नगरमधील एका बारमधील व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक जण दारूचा घोट घेत शासकीय फाईल्स दाखवताना दिसतोय. तर महाराष्ट्र शासनाच्या फाईल्स असल्याचा मथळा या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतोय. दरम्यान, बारमध्ये शासकीय फाईल्स घेऊन जाणारे तीन अधिकारी कोण? हे अधिकारी कोणत्या विभागाचे? त्यांनी कोणत्या महत्त्वाच्या फाईल्स आणल्या? असे अनेक प्रश्न या व्हिडीओच्या निमित्ताने समोर येत आहेत. ‘सही करून पैसे कमवण्याचं सुरक्षित स्थळ कोणतंय तर त्यांनी बिअरबार निवडवलं. कार्यालयात नाही तर बिअर पिता-पिता दोन्ही आनंद घ्यायचे. दारूचा घोट घेऊन आनंद घ्यायचा आणि टेबला खालून पैसेही घ्यायचे.. सरकार दुहेरी आनंदात आहे. एकीकडे नशा आणि दुसरीकडे पैसा…’, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक आरोप केलाय.

Published on: Jul 28, 2025 01:51 PM