BMC Election :  पालिका निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी, तीन टप्प्यात होणार मतदान? राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश काय?

BMC Election : पालिका निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी, तीन टप्प्यात होणार मतदान? राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश काय?

| Updated on: Jul 11, 2025 | 10:28 AM

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. त्यानंतर १ जुलै २०२५ पर्यंत ज्यांनी मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली होती. ज्यांची नोंदणी करण्यात आली त्यांनाही आता मतदानाचा अधिकार असणार आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी, असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदारांची संख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वाढेल, असा अंदाज व्यक्त करताना प्राथमिक तयारीबाबत आयोगाची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. समोर आलेल्या माहितीनुसार, एकूण ६७६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. या सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी आयोगाला सुमारे साडेसहा लाख EVM मशीनची आवश्यकता आहे. तर आपुऱ्या EVM संख्येमुळे आयोगासमोर एकाच टप्प्यात मतदान घेणं मोठं आव्हान असणार आहे.  त्यामुळे यंदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तीन टप्प्यात होण्याची शक्यता आहे.

Published on: Jul 11, 2025 10:28 AM