Special Report | ‘शिवबंधन’नंतर आता प्रतिज्ञापत्र, गळती रोखण्यासाठी शिवसेनेचा काय आहे फंडा? पाहा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Jul 02, 2022 | 11:01 PM

उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास असल्याचं ते प्रतिज्ञापत्र असणार आहे. बंडखोरांच्या भूमिकेवरुन आता असा बदल पक्षामध्ये केला जात असल्याचं बोललं जातंय. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर एक नाही दोन नाही तर 39 आमदारांनी बंड केले आहेत. एवढंच नाही तर आता खासदारही शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे प्रतिज्ञापत्र तर नाही ना, अशीही चर्चा संध्या रंगली आहे. पाहा याविषयीचा स्पेशल रिपोर्ट...

Follow us on

मुंबई : शिवसैनिक हे (Shivsena) शिवसेनेशी किती एकनिष्ठ आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न सातत्यानं होत असला तरी गेल्या काही दिवसांपासून सुरु झालेली गळती खुद्द पक्षप्रमुख यांना देखील रोखता आलेली नाही. (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांच्या बरोबर एक नाही दोन नाही तर 39 आमदारांनी बंड केले आहेत. एवढंच नाही तर आता खासदारही शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता पक्षाकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. आतापर्यंत शिवबंधन बांधले जात होते. पण, यानंतर शिवसैनिकांना एकनिष्ठतेचं (Declarationप्रतिज्ञापत्रच द्यावे लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास असल्याचं ते प्रतिज्ञापत्र असणार आहे. बंडखोरांच्या भूमिकेवरुन आता असा बदल पक्षामध्ये केला जात असल्याचं बोललं जातंय. शिवबंधन नंतर आता चर्चा आहे ती प्रतिज्ञापत्राची, पाहा यासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट…