सोमय्यांना दिलासा ! अटकेपासून संरक्षण…

| Updated on: Apr 28, 2022 | 6:37 PM

त्यामुळे सोमय्या अडचणीत आले होते. त्यानंतर ते काही दिवस नॉट रिचेबल होते. मुंबई पोलिसांनी सोमय्या यांची दोनदा चार चार तास चौकशी केली होती. त्यानंतर आज पुन्हा हे प्रकरण कोर्टात आलं असता कोर्टाने त्यांना अटकेपासून संरक्षण देत मोठा दिलासा दिला आहे.

Follow us on

मुंबई : आयएनएस विक्रांत (INS Vikrant) घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) आणि त्यांचे चिरंजीव नील सोमय्या यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमय्या यांना 14 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन येत्या 14 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. एका माजी सैनिकाच्या तक्रारीवरून सोमय्या आणि त्यांच्या चिरंजीवांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमय्या यांनी सेव्ह विक्रांतच्या नावाखाली 57 कोटी रुपये हडपल्याचा आरोप आहे. शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांनीही हा आरोप लावून धरला होता. त्यामुळे सोमय्या अडचणीत आले होते. त्यानंतर ते काही दिवस नॉट रिचेबल होते. मुंबई पोलिसांनी सोमय्या यांची दोनदा चार चार तास चौकशी केली होती. त्यानंतर आज पुन्हा हे प्रकरण कोर्टात आलं असता कोर्टाने त्यांना अटकेपासून संरक्षण देत मोठा दिलासा दिला आहे.