Corona Vaccination | लहान मुलांच्या कोवोवॅक्स लसीला WHOची मंजुरी

| Updated on: Dec 17, 2021 | 11:33 PM

जगभरात ओमिक्रॉनचा फैलाव आणि भीती पसरली असतानाच भारतीयांसाठी आणि जगासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण सीरम इन्स्टिट्यूटनं लहान मुलांसाठी तयार केलेल्या कोरोना लसीला (Covovax) ‘WHO’कडून मंजुरी मिळाली आहे.

Follow us on

जगभरात ओमिक्रॉनचा फैलाव आणि भीती पसरली असतानाच भारतीयांसाठी आणि जगासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण सीरम इन्स्टिट्यूटनं लहान मुलांसाठी तयार केलेल्या कोरोना लसीला (Covovax) ‘WHO’कडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांना लवकरच लस मिळू शकणार आहे. त्यामुळे लहान मुलांना आता लवकरच लसीकरण करण्यास सुरूवात केली जाऊ शकते. महाराष्ट्र राज्य देशात लसीकरणात आघाडीवर आहे.

12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांना लवकरच लस

सीरमच्या आदर पुनावाला यांनी ट्विटर करून लहान मुलांसाठी तयार केलेल्या कोरोना लसीला (Covovax) ‘WHO’कडून मंजुरी मिळाल्याची माहिती दिली आहे. राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव वाढत होता, अशात राज्य सरकारकडून लसीकरणाची वयोमर्यादा कमी करण्याचा विचार सुरू होता, मात्र आता ती वेळ टळणार आहे. लहान मुलांसाठी वेगळी लस तयार आहे. त्यांना 18 वर्षे वयोगटावरील लस देऊन जोखीम पत्करण्याची आता गरज उरली नाही, सीरमने 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी वेगळी Covovax ही लस तयार केली आहे. त्यामुळे आता लवकरच लहान मुलांचे लसीकरण करण्यास सुरूवात केली जाऊ शकते.