ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत का आहे अश्वाची परंपरा ? नेमकं कारण काय?

| Updated on: Jun 13, 2023 | 10:55 AM

आळंदीतून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी रथाचे सोमवारी सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. लाखो वारकरी भाविकांसह माऊली माऊलीच्या जयघोषात, हरिनामाच्या गजरात, भक्तिमय वातावरण याठिकाणी पाहायला मिळालं. यावेळी माऊलींचा रथ व पालखी आकर्षक रित्या फुलांनी सजवण्यात आली होती.

Follow us on

पुणे : आळंदीतून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी रथाचे सोमवारी सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. लाखो वारकरी भाविकांसह माऊली माऊलीच्या जयघोषात, हरिनामाच्या गजरात, भक्तिमय वातावरण याठिकाणी पाहायला मिळालं. यावेळी माऊलींचा रथ व पालखी आकर्षक रित्या फुलांनी सजवण्यात आली होती. संत ज्ञानेश्वर महारांजाच्या पालखी सोहळ्यातील मानाचा मानला जाणाऱ्या अश्वाने सोमवारी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी अश्वाचे मंदिर प्रशासनाने पूजन केले. माऊलींच्या पालखीत जाणाऱ्या हिरा आणि मोती या अश्वांना मोठी परंपरा आहे. पादुकांप्रमाणेच वारकरी अश्वाचं दर्शन घेतात.हिरा या अश्वावर चोपदार आरुढ असतात.यंदा पाऊसपाणी चांगला पडू दे अशी प्रतिक्रिया या चोपदारानं दिली.तुकाराम कोळी यांना दरवर्षी मान दिला जातो.