Special Report | भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात विनयभंग?

Special Report | भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात विनयभंग?

| Edited By: | Updated on: Sep 23, 2021 | 9:18 PM

बोरिवलीत भाजप नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात एका महिलेचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल झाला आहे.

बोरिवलीत भाजप नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात एका महिलेचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल झाला आहे. पण या प्रकरणी तक्रार करणाऱ्या पीडितेला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित भाजप नगरसेविका आणि कार्यकर्त्यांनी पीडितेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावरुन महापौर किशोरी पेडणेकर यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात जावून माहिती घेतली. तर भाजप नगरसेविका अंजली खेडेकर यांनी एक वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेवर आता तक्रार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच पद दिलं नाही म्हणून महिलेने हे आरोप केले, असंही खेडेकर म्हणाल्या आहेत.