अन्न व औषध प्रशासन खात्याची चौकशीची विनंती करणारं मुख्यमंत्र्यांना पत्र; संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Apr 19, 2023 | 3:28 PM

यवतमाळ : मंत्री संजय राठोड यांच्या खात्याची चौकशी करण्यात यावी, असं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिण्यात आलं आहे. त्यावर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात अनेक ठिकाणी बोगस औषधी वाटप केलं जातं. त्यावर कारवाई ह्या अन्न व औषध विभागकडून केली जात आहे. अशा 7000 कारवाया करण्यात आल्या आहेत. विवेक कांबळे यांना ओरोफ्लोम इंजेक्शन दिलं. ते इंजेक्शन […]

Follow us on

यवतमाळ : मंत्री संजय राठोड यांच्या खात्याची चौकशी करण्यात यावी, असं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिण्यात आलं आहे. त्यावर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात अनेक ठिकाणी बोगस औषधी वाटप केलं जातं. त्यावर कारवाई ह्या अन्न व औषध विभागकडून केली जात आहे. अशा 7000 कारवाया करण्यात आल्या आहेत. विवेक कांबळे यांना ओरोफ्लोम इंजेक्शन दिलं. ते इंजेक्शन लोह वाढविण्यासाठी होतं. हे इंजेक्शन बनावट होतं. 40 दुकानावर कारवाई केली गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत कडक कारवाई केली म्हणून आरोप करणं चुकीचं आहे. ह्या कारवायांना सुनावणी न घेता स्थगिती द्यावी. यासाठी संघटनेकडून सांगितलं जातं. मात्र क्षेत्रीय स्तरावर कारवाई झाली तर त्या कर्मचाऱ्यांचं मनोबल खचतं होते. त्यामुळे सुनावणी घेऊन सदर प्रकरणामध्ये कारवाई केली जाते. संघटनेने गैरसमजामधून हे पत्र देण्यात आलं आहे, असं संजय राठोड म्हणाले आहेत.