Nawab Malik | कोश्यारी तुम्ही राज्यपाल आहात, मुख्यमंत्री नाही : नवाब मलिक

Nawab Malik | कोश्यारी तुम्ही राज्यपाल आहात, मुख्यमंत्री नाही : नवाब मलिक

| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 4:47 PM

राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हिंगोली, परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला आहे.

राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हिंगोली, परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला आहे. राज्यपाल हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाहीत तर ते राज्यपाल आहेत, हे त्यांनी समजून घ्यावं, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांच्या या दौऱ्यावरील सरकारची नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांचा हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये दौरा आहे. या तीन पैकी दोन जिल्ह्यात राज्यपाल विद्यापीठातील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. त्याला आमचा आक्षेप नाही. मात्र या तिन्ही जिल्ह्यात ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आढावा घेणार आहेत. त्याला आमचा विरोध आहे. हा सरकारच्या कामात हस्तक्षेप आहे. असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.