AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KCC कर्ज थकले तर जमिनीचा लिलाव? योजनेचे नियम आणि अधिकार जाणून घ्या

Kisan Credit Card Land auction: किसान क्रेडिट कार्डचे कर्ज भरता आले नाही तर बँक अगोदर नोटीस पाठवते. मग तडजोडीचा प्रयत्न करण्यात येतो. जर त्यातही तोडगा निघाला नाही तर मग कायदेशीर कारवाईचा पर्याय मोकळा असतो.

KCC कर्ज थकले तर जमिनीचा लिलाव? योजनेचे नियम आणि अधिकार जाणून घ्या
किसान क्रेडिट कार्डImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 22, 2026 | 2:14 PM
Share

Kisan Credit Card Land auction: किसान क्रेडिट कार्ड (KCC) शेतकर्‍यांसाठी एक मोठा दिलासा आहे. या योजनेत कमी व्याज दराने शेतीसाठी सहज कर्ज उपलब्ध होऊ शकते. पण अनेक जण आर्थिक परिस्थितीमुळे या योजनेचे कर्ज वेळेवर फेडू शकत नाहीत. तेव्हा त्यांच्या मनात वारंवार हा प्रश्न डोकावतो की, कर्ज परतफेड केले नाही तर त्यांच्या जमिनीचा लिलाव केल्या जाऊ शकतो का? खरंच असं होतं का? काय आहे याविषयीचे नियम?

सावकारीपासून वाचवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेत स्वस्त दराने बँक कर्ज पुरवठा करतात. या योजनेतंर्गत शेतकरी त्यांच्या गरजेनुसार, शेती, बि-बियाणे , खते आणि सिंचनासाठी याचा वापर करू शकतात. ही एक लवचिक क्रेडिट प्रणाली आहे. या योजनेसाठी वारंवार अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

किती रुपयांपर्यंत मिळते कर्ज?

KCC योजनेतंर्गत 50 हजार ते 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार ते कमी जास्त होते. जर शेतकऱ्याने वेळेवर कर्ज चुकते केले तर व्याजावर सबसिडी देण्यात येते. त्यामुळे व्याजदर जवळपास 4 टक्क्यांवर येते. पण जर कर्जाची रक्कम देण्यास शेतकरी असमर्थ असले तर बँक लागलीच कडक कारवाई करत नाही. सर्वात अगोदर बँक कर्ज चुकतं करण्यासाठी आठवण करून देते. बँक नोटीस पाठवते. जर 90 दिवसांपर्यंत कर्ज फेडले नाही तर ते खाते NPA म्हणून जाहीर करण्यात येते. यानंतर बँक वसुलीची प्रक्रिया राबवते. त्याअगोदर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येतो.

तर मग जमिनीचा लिलाव

जर कर्ज परतफेड करण्याची शेतकऱ्याची मानसिकता दिसली नाही तर मग हे प्रकरण प्रशासनापर्यंत पोहचते. तहसीलमध्ये याला महसुली कर्ज म्हटले जाते. त्यानंतर वसुलीची प्रक्रिया सुरू होते. जमीन जप्त करून तिचा लिलाव करण्यात येतो. हा अंतिम टप्पा असतो. जमिनीच्या लिलावापूर्वी अगोदर शेतकर्‍याला जाहीर नोटीस देण्यात येते. त्याला कर्ज भरपाईसाठी अखेरची संधी देण्यात येते. जर ही अखेरची संधी दवडली. तर मग बँक लिलाव जाहीर करून जमीन विक्रीतून वसूली करते. या लिलावातून जी अतिरिक्त रक्कम उरते ती शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येते. अर्थात, दुष्काळी, अवकाळी, अतिवृष्टी, भूकंप वा इतर नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांवर बँका वसुलीसाठी दबाव आणू शकत नाहीत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...