Aurangabad : नाव मोठं अन् लक्षण खोटं, हंगाम सुरु होण्यापूर्वीच कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

कन्नड तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. या तिन्हीही दुकानातून वाढीव दराने खते आणि बियाणे विक्री करुन शेतकऱ्यांची लूट केली जात होती. कृषी सेवा केंद्रांची नावे तर गणेश, प्रगती आणि प्रशांत कृषी सेवा केंद्र पण याच दुकानातून शेतकऱ्यांकडून अधिकचा मेवा घेतला जात होता.

Aurangabad : नाव मोठं अन् लक्षण खोटं, हंगाम सुरु होण्यापूर्वीच कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द
बनावट खत
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 4:31 PM

औरंगाबाद : यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच (Market) बाजारपेठेत खत-बियाणांची (Artificial scarcity) कृत्रिम टंचाई निर्माण केली जाण्याचा संशय कृषी विभागाला होता. त्यानुसार ज्यादा दराने निविष्ठांची विक्री करण्यासही सुरवात झाली होती. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात ज्यादा दराने खत आणि बियाणांची विक्री करणाऱ्या ती कृषी सेवा केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. (Agricultural Department) कृषी विभागाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली असून हंगाम सुरु होण्यापूर्वीच शेतकऱ्यांची लूट सुरु झाली आहे. कृषी सेवा केंद्राच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी तालुकानिहाय भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. याच भरारी पथकांकडून आता कारवाईला देखील सुरवात झाली आहे. मध्यंतरी वर्धा येथे कारवाई झाल्यानंतर आता कन्नड तालुक्यातील 3 दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत.

नावात देव काम सैतानाचे

कन्नड तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. या तिन्हीही दुकानातून वाढीव दराने खते आणि बियाणे विक्री करुन शेतकऱ्यांची लूट केली जात होती. कृषी सेवा केंद्रांची नावे तर गणेश, प्रगती आणि प्रशांत कृषी सेवा केंद्र पण याच दुकानातून शेतकऱ्यांकडून अधिकचा मेवा घेतला जात होता. मात्र, भरारी पथकांनी वेळीच कारवाई केल्याने आता ऐन हंगामात अशा घटनांवर निर्बंध येईल. या तिन्हही दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात त्यांना खत-बियाणांची विक्री करता येणार की नाही? हा प्रश्नही बाकी आहे.

कृत्रिम टंचाई अन् महागाईचा बाऊ

यंदा जागतिक स्तरावरील परिणाम खत पुरवठ्यावर होणार अशी चर्चा हंगामाच्या पूर्वीपासूनच आहे. यातच खतासाठी आवश्यक असलेला कच्चा मालाचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे यंदा रासायनिक खताची टंचाई भासणार असे चित्र निर्माण झाले होते पण केंद्राने खतासाठी वाढीव अनुदान देऊन वाढत्या दराची झळ ही शेतकऱ्यांना बसलेली नाही. मात्र, याच परस्थितीचा फायदा घेत कृषी सेवा केंद्राकडून अधिकचे दर लावले जात आहेत.हा गैरप्रकार समोर येताच कारवाई करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांनो ही घ्या काळजी

शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे. जे शेतकरी उधारीवर खत घेतात त्यांनाच सेवा चालक हे साधे बील देतात.

Non Stop LIVE Update
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.