VIDEO | शिवसेना आमदाराची हटके स्टाईल, थेट शेतात उतरुन यंत्राद्वारे भात लावणी

दरवर्षी पावसाळ्यात वैभव नाईक कुठे ना कुठे तरी शेती करताना दिसतात. त्यांचा तो व्हिडीओ नेहमी व्हारल होत आहे. (Shivsena MLA Vaibhav Naik Planting in the Farm)

VIDEO | शिवसेना आमदाराची हटके स्टाईल, थेट शेतात उतरुन यंत्राद्वारे भात लावणी
Vaibhav Naik Planting rice farm


सिंधुदुर्ग : कोकणातील शिवसेनेचे ढाणे वाघ म्हणून ओळखले जाणारे आमदार वैभव नाईक हे गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी कुडाळमध्ये झालेल्या राड्याने चर्चेत आले होते. मात्र आता वैभव नाईक एका हटके स्टाईलने सध्या चर्चेत आले आहेत. (Shivsena MLA Vaibhav Naik Rice Planting in the Farm)

दरवर्षी पावसाळ्यात वैभव नाईक कुठे ना कुठे तरी शेती करताना दिसतात. त्यांचा तो व्हिडीओ नेहमी व्हारल होत आहे. सध्या कालपासून असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आता ही सध्या कालपासून असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात वैभव नाईक शेतात उतरुन यंत्राद्वारे लावणी करताना दिसत आहेत.

स्वतः भात लावणी यंत्र चालवून प्रात्यक्षिक

महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा सध्या कृषी संजीवनी सप्ताह 21 जून ते 1 जुलै या कालावधीत साजरा होत आहे. याअंतर्गत विविध योजनांचे मार्गदर्शन आणि शेतीशाळा हा कार्यक्रम झाराप येथे आयोजित करण्यात आला होता. याचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वैभव नाईक यांनी स्वतः भात लावणी यंत्र चालवून भात लावणीचे प्रात्यक्षिक केले.

पाहा व्हिडीओ :


(Shivsena MLA Vaibhav Naik Rice Planting in the Farm)

संबंधित बातम्या : 

तब्बल 11 वर्षांची खडतर मेहनत, कोकणच्या सुपुत्राचा Sword of Honour ने सन्मान, कोकणवासियांची मान उंचावली

PHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड

Video | खासदार उदयनराजेंची धूम स्टाईल, सुस्साट जिप्सी राईड एकदा पाहाच

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI