Sugarcane : ऊस बिलासाठी बीडचे शेतकरी सोलापुरात, साखर सहआयुक्त कार्यालयाकडील तक्रारीने लागणार का प्रश्न मार्गी..?

गत हंगामात सर्वच साखर कारखान्यांचे गाळप हे पूर्ण क्षमतेने सुरु होते. असे असतानाही गाळप हे पूर्ण होऊ शकले नाही. अतिरिक्त उसाची समस्या विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली होती. त्यामुळे बीडच्या शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील गोकूळ शुगरकडे ऊसाचे गाळप केले. यामुळे गाळप तर झाले पण शेतकऱ्यांचा उद्देश काही साध्य झाला नाही.

Sugarcane : ऊस बिलासाठी बीडचे शेतकरी सोलापुरात, साखर सहआयुक्त कार्यालयाकडील तक्रारीने लागणार का प्रश्न मार्गी..?
साखर कारखाना
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 3:06 PM

सोलापूर : संबंध राज्यात (Sugarcane workers) उसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. येथील ऊसतोड कामगारांमुळे (Cane sludge) ऊसाचे गाळप वेळेत होते. त्यामुळे कारखान्याचे उद्दिष्टही साधेल जाते आणि शेतकऱ्यांचाही फायदा होता. मात्र, याच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हेळसांड (Solapur) सोलापुरातील गोकूळ शुगरकडून होत आहे. या कारखान्याने बीडमधील शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप तर केले पण अद्यापपर्यंत बिलाचा एकही हप्ता दिलेला नाही. (Outstanding Bill) थकीत बिलासाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा मागणी केली एवढेच नाहीतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये मेळावाही पार पडला. पण बिलाचा प्रश्न काही मार्गी लागला नाही. आता शेतकऱ्यांनी थेट गोकूळ शुगरविरोधात साखर सहआयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळणार का हे पहावे लागणार आहे.

अतिरिक्त ऊसामुळे उद्भवली समस्या

गत हंगामात सर्वच साखर कारखान्यांचे गाळप हे पूर्ण क्षमतेने सुरु होते. असे असतानाही गाळप हे पूर्ण होऊ शकले नाही. अतिरिक्त उसाची समस्या विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली होती. त्यामुळे बीडच्या शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील गोकूळ शुगरकडे ऊसाचे गाळप केले. यामुळे गाळप तर झाले पण शेतकऱ्यांचा उद्देश काही साध्य झाला नाही. आता गाळप होऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला असून या शेतकऱ्यांना एकही बील मिळाले नाही. अतिरिक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण झाल्यानेच शेतकऱ्यांना इतरत्र गाळप करावे लागले होते.

शेतकऱ्यांचे प्रश्न निष्फळ

आपल्या हक्काचे पैसे मिळावेत यासाठी शेतकऱ्यांनी साखर कारखान्याकडे खेटे मारले होते. मात्र, कारखाना प्रशासनाने त्यांच्या कायम दुर्लक्ष केले होते. शेतकऱ्यांची एकही मागणी प्रशासनाने मान्य केली नाही. यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा पार पडला होता या दरम्यानही रखडलेल्या ऊस बिलाचा प्रश्न मांडण्यात आला होता. आता सरकार बदलले पण शेतकऱ्यांच्या बिलाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे आता सहा महिन्यानंतर का होईना शेतकऱ्यांना त्यांची बिले मिळणार का हे पहावे लागणार आहे.

सहआयुक्तांकडे शेतकऱ्यांची तक्रार

मागणी, मेळावे करुनही रखडलेल्या ऊसबिलासाठी शेतकऱ्यांनी आता थेट सहआयुक्त यांच्या कार्यालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रखडेलल्या मागण्या पूर्ण होतील असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. हा साखर कारखाना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दत्ता शिंदे यांचा आहे. काही दिवसापूर्वी तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावाही घेण्यात आला होता. मात्र त्याच्या काही महिन्यातच बील न मिळाल्याची तक्रार करणारे शेतकरी समोर आलेत. दरम्यान साखर आयुक्तालयातून या संचालकांना फोन केल्यानंतर येत्या आठ दिवसात बील देतो असे सांगण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिलीय.

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.