मारुती ते रेनॉ, चांगल्या बूट स्पेससाठी या 4 बजेट कारला तोड नाय…

आपण कार खरेदी करीत असताना तिचे फिचर्स, इंजिन, सेफ्टी यासह अजून एका गोष्टीचे आवर्जुन मूल्यमापन करतो, ती म्हणजे कारला असलेली बूट स्पेस... अनेकांना वाहनात चांगली बूट स्पेस हवी असते. सामान वाहून नेताना बूट स्पेस कामी येत असल्याने ते जास्त सोयीचे ठरत असते. आज अशाच बजेटमधील कार पाहणार आहेत, ज्यात तुम्हाला चांगली बूट स्पेस मिळू शकते.

मारुती ते रेनॉ, चांगल्या बूट स्पेससाठी या 4 बजेट कारला तोड नाय...
budget cars Image Credit source: renault.co.in
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 4:52 PM

मुंबई : कार (cars) खरेदी करीत असताना आपण अनेक पातळ्यांवर तिची माहिती घेतो. जसे की, कारमध्ये आरामदायक आसन व्यवस्था असायला हवी, हेड स्पेस चांगली असल्यास उंच व्यक्तीदेखील आरामात प्रवास करु शकेल, याशिवाय बूट स्पेसदेखील (boot space) पाहिली जाते. पिकनिक किंवा कुटुंबियांसह फिरायला जात असताना जास्तीत जास्त आवश्‍यक सामान कारमध्ये बसावं यासाठी बूट स्पेस अत्यंत आवश्‍यक ठरते. त्यामुळे कुठलीही कंपनी कार बनवताना ग्राहकांची मागणी लक्षात ठेवूनच कारची रचना केली जाते. अनेकदा चांगली बूट स्पेस देणाऱ्या कारची किंमत आवाक्याबाहेर असते. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी बजेटमध्ये (budget) म्हणजेच सात लाखांहूनही कमी किंमत असलेल्या काही कारची माहिती देणार आहोत, ज्यात तुम्हाला चांगली बूट स्पेस मिळू शकेल.

1. रेनॉ क्विड, 300 लीटर्स

रेनॉची ही एक सर्वात बजेटमधील कार आहे. या कारमध्ये अनेक चांगले फिचर्स ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यात एक चांगली बूट स्पेस देण्यात आला आहे. बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या कारच्या तुलनेत रेनॉ क्विडला सर्वाधिक बूट स्पेस देण्यात आला आहे. या कारची स्‍पर्धा मारुती अल्‍टो 800 सोबत केली जाते. अल्टोमध्ये 177 लीटर बूट स्पेस मिळते तर दुसरीकडे ह्युंडईमध्ये 215 लीटर बूट स्पेस असून क्विडमध्ये तब्बल 300 लीटर बूट स्पेस मिळत आहे.

2. मारुती सुझुकी वॅगन आर

मारुती सुझुकीची वेगन आर ही सर्वाधिक विकली जाणारी व तुमच्या बजेटमध्ये असणारी कार आहे. यात मोठा बूट स्पेस मिळू शकतो. ही एक हॅचबॅक कार आहे. यात केवळ बूट स्पेसच नाही तर, चांगलं मायलेजदेखील मिळतं. भारतातील ही सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक आहे.

3. होंडा जॅझ

होंडा जॅझएक प्रीमिअम क्लास हॅचबॅक कार आहे. या कारमध्ये केवळ चांगली बूट स्पेसच नाही तर, अनेक चांगले फिचर्सदेखील उपलब्ध आहेत. आपल्या रायव्हल्स कारच्या तुलनेत यात चांगली बूट स्पेस देण्यात आली आहे.

4. मारुती सुझुकी बलेनो

बलेनो ही एक प्रीमिअम क्लास असलेली हॅचबॅक कार आहे. यात तब्बल 339 लीटर इतका बूट स्पेस मिळत आहे. नुकतीच कंपनीने या कारला अपडेट करुन नवीन व्हर्जन बाजारात आणले आहे. यात 360 व्ह्यू कॅमेरासोबत हेडअप डिसप्ले देण्यात आला आहे.

इतर बातम्या

वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर

Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती

3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.