AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्र किंवा नातेवाईकांच्या कर्जात ‘गॅरेंटर’ राहणं पडू शकते महागात! या पाच जोखीम जाणून घ्या

दोस्ती यारी किंवा नातेवाईकांच्या गोड बोलण्यात आपण त्यांच्या कर्जाचे गॅरेंटर (हमीदार) राहतो. पण असं करणं भविष्यात खूपच महागात पडू शकते. यामुळे तुम्ही अडचणीतही येऊ शकता. चला जाणून घेऊयात गॅरेंटर राहिल्यानंतर पाच जोखीम कोणत्या असतात ते...

मित्र किंवा नातेवाईकांच्या कर्जात 'गॅरेंटर' राहणं पडू शकते महागात! या पाच जोखीम जाणून घ्या
मित्र किंवा नातेवाईकांच्या कर्जात 'गॅरेंटर' राहणं पडू शकते महागात! या पाच जोखीम जाणून घ्याImage Credit source: TV9 Network/Hindi वरून
| Updated on: Jun 02, 2026 | 4:21 PM
Share

आयुष्य जगण्यासाठी हातात पैसा असणं गरजेचं आहे. पण कधी कधी बँकेचं कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा स्थितीत बँकेकडे धाव घेतली जाते. पण बँकही गॅरेंटर असल्याशिवाय कर्ज देत नाही. त्यामुळे जवळचे नातेवाईक किंवा मित्रांना गॅरेंजर राहा म्हणून विनवणी केली जाते. तु्म्हालाही अशीच कोणी विनवणी केली असेल तर ही बातमी एकदा वाचा. गॅरेंटर राहणं किती जोखीमेचं आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. तुम्ही मदत केली म्हणून छातीही फुगवाल. पण भविष्यात काय मांडून ठेवलं आहे याचा अंदाजही तुम्हाला येणार नाही. एखाद्या कर्जाची हमी घेणं एक कायदेशीर प्रक्रियाच नाही, तर आर्थिक जबाबदारीही आहे. गॅरेंटी घेणआरा व्यक्ती बँक किंवा फायनान्सियल संस्थेला कर्जाची लिखित हमी देतो. जर सदर व्यक्तीने कर्ज भरलं नाही तर ते भरण्याची जबाबदारी माझी असेल. खासकरून पर्सनल लोन दरम्यान गॅरेंटर राहणाऱ्यांसाठी ही बातमी आहे. चला जाणून घेऊयात..

गॅरेंटर राहिल्या या पाच जोखीम

  • तुम्ही एखाद्या व्यक्तीचे गॅरेंटर असाल तर सर्वात आधी तुमचा सिबिल रेकॉर्ड खराब होता. कर्जदाराने एखादा हप्ता किंवा कर्ज भरलं नाही तर त्याचा थेट परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होऊ शकतो. भले तुम्ही लोन घेतलं नसेल पण गॅरेंटर असल्याने तुमची क्रेडिट हिस्ट्री खराब होऊ शकते. भविष्यात जेव्हा तुम्हाला कर्ज घेण्याची गरज असेल तेव्हा तुम्ही अडचणीत येऊ शकता.
  • कर्ज घेणारी व्यक्तीने बँकेची फसवणूक केली किंवा बेपत्ता झाली तर कायदेशीररित्या कर्ज तुमच्याकडून वसूल केलं जातं. त्यामुळे तुम्हाला कर्ज आणि कर्जाचे हप्ते भरण्याशिवाय पर्यात उरत नाही. अनेकदा कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे आर्थिक आणि मानसिक त्रास होतो.
  • कर्जदार व्यक्तीने लोन भरलं नाही आणि तुम्हीही भरू शकला नाहीत, तर तुमच्या संपत्ती आणि बचतीवर घाव होऊ शकतो. करारानुसार बँक तुमच्या बचत किंवा संपत्ती विकून पैसे वसूल करू शकते. त्यामुळे तुम्ही मेहनतीने कमावलेले पैसे दुसऱ्याच्या चुकीमुळे वाया जाऊ शकतात.
  • तुम्ही एखाद्या कर्जदाराचे हमीदार असाल तुम्हालाही भविष्यात कर्ज मिळणं कठीण होईल. कारण एकदा हमी घेतलेली असेल तर बँका कर्ज देत नाहीत. कारण आधीच तुम्ही एखाद्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे बँका हमीदार असल्याने तुमचा अर्ज बाद करू शकतात.
  • पैशांमुळे भांडणं होतात हे सर्वश्रूत आहे. त्यामुळे कर्जदाराने तुम्हाला आर्थिक अडचणीत आणलं तर सहाजिकच नात्यात दूरावा निर्माण होणार.. त्यामुळे एखाद्या कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा हमीदार राहणं हे जोखीमेचं आहे. त्यामुळे गॅरेंटर (हमीदार) राहण्यापूर्वी विचार करा. कारण तुम्ही एकदा गॅरेंटी घेतली तर तुम्हाला त्यातून माघारही घेता येत नाही.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात