कच्च्या तेलाचे दर आणखी घसरले; भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढ-उतार पहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाचे भाव तब्बल प्रति बॅरल 5 डॉलरने कमी झाले आहेत.

कच्च्या तेलाचे दर आणखी घसरले; भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर
झारखंडमध्ये पेट्रोलचे दर 25 रुपयांनी घटवले
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 1:48 PM

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढ-उतार पहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाचे भाव तब्बल प्रति बॅरल 5 डॉलरने कमी झाले आहेत. 85 डॉलर प्रती बॅलरवरून दर 80 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. कोरोना नंतर कच्च्या तेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र त्या तुलनेत मागणी  कमी असल्याने कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण होत असताना देशात पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र दर स्थिर असल्याचे पहायाला मिळत आहे.

राजस्थानमध्ये पेट्रोल स्वस्त

दुसरीकडे राजस्थान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेवरील व्हॅट कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राजस्थामध्ये पेट्रोल 4 रुपयांनी तर डिझेल पाच रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. यापूर्वी पंजाब आणि उत्तर प्रदेश सरकारने देखील पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे प्रचंड वाढल्याने, जनतेला दिलासा देण्यासाठी क्रेंद्राने  उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार देशात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर राज्यांनी देखील पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी कराव्यात असे आवाहन केंद्राकडून करण्यात आले होते.

अनेक राज्यांनी दर केले कमी

केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक राज्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले आहेत. यामध्ये पंजाब, उत्तरप्रदेश राजस्थान अशा मोठ्या राज्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीमध्ये पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्हॅट कमी झाल्याने पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी झाल्या आहेत.

संबंधित बातम्या 

‘एसबीआय’ची ग्राहकांसाठी खास ऑफर; गोल्ड लोन झाले स्वस्त, जाणून घ्या काय आहेत नवे व्याजदर?

बचतीचा सोपा मार्ग! ‘इथे’ करा गुंतवणूक; 21 वर्षांमध्ये मिळवा 1 कोटी रुपये

Non Stop LIVE Update
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.