AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | आईच्या हातांनी बनवलेले समोसे विकण्यासाठी सोडली गूगलची नोकरी, आता कमावतो लाखो रुपये

Mother's Day Special : 'द बोहरी किचन'चे मालक मुनाफ कपाडिया यांनी फक्त समोसा विक्रीसाठी गुगलची नोकरी सोडली आणि नोकरी सोडल्यानंतर केवळ एका वर्षात त्यांची उलाढाल 50 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली. (He quit his job at Google to sell his mother's hand-made samosas and now earns in millions)

| Updated on: May 08, 2021 | 7:20 PM
Share
जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी गुगलमध्ये काम करणे प्रत्येकाचे स्वप्न आहे. कारण काम आणि पगाराच्या बाबतीत गुगलला अधिक चांगले मानले जाते. गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी बर्‍याच मुलाखती द्याव्या लागतात. या मुलाखतीत जो पास होतो त्याला नोकरी मिळते. पण समोसा विकण्यासाठी कोणीही आपली गूगलचा जॉब सोडू शकतो का? 'द बोहरी किचन'चे मालक मुनाफ कापडिया यांनीही असेच काहीसे केले आहे. आईच्या हातांनी बनवलेले समोसे विकण्यासाठी त्याने आपली गुगल नोकरी सोडली. पण अवघ्या एका वर्षानंतर त्यांची उलाढाल 50 लाख रुपयांच्या पुढे गेली.

1 / 8
त्यांनी असे का केले - मुनाफ कपाडिया यांच्या फेसबुक प्रोफाईलमध्ये असे लिहिले आहे की, मी तो व्यक्ती आहे ज्याने समोसा विक्रीसाठी गुगलची नोकरी सोडली. पण त्यांच्या समोशाचे वैशिष्ट्य म्हणजे तो मुंबईच्या पंचतारांकित हॉटेल्स आणि बॉलिवूडमध्ये खूप लोकप्रिय आहे.

2 / 8
मुनाफने एमबीएचे शिक्षण घेतले होते आणि त्यानंतर त्यांनी काही कंपन्यांमध्ये नोकरी केली आणि त्यानंतर परदेशात गेले. परदेशात काही कंपन्यांमध्ये मुलाखती दिल्यानंतर मुनाफला गुगलमध्ये नोकरी मिळाली. गुगलमध्ये काही वर्षे काम केल्यावर मुनाफला वाटले की यापेक्षाही आपण एखादे चांगले काम करू शकतो. त्यानंतर ते घरी परतले.

3 / 8
मुनाफ म्हणतो की त्याची आई नफिसाला टिव्ही पाहण्याची खूप आवड आहे आणि ती टिव्हीसमोर बराच वेळ घालवत असे. तिला फूड शो पहायला आधिक आवडायचे आणि म्हणूनच ती छान खाद्यपदार्थ बनवायची. आईकडून टिप्स घेतल्यावर फूड चेन उघडेल असं मुनाफला वाटलं. त्याने रेस्टॉरंट उघडण्याची योजना आखली आणि बर्‍याच लोकांना आईचे जेवण दिले. प्रत्येकाने त्यांच्या अन्नाची प्रशंसा केली. यामुळे मुनाफला चालना मिळाली आणि त्यांनी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरुवात केली.

4 / 8
समोसा-मुनाफचा द बोहरी किचन ट्रेडमार्क आहे. केवळ मुंबईतच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे. मुनाफच्या रेस्टॉरंटमध्ये केवळ समासोच मिळत नाही. मात्र समोसा हा त्याचा ट्रेडमार्क आहे.

5 / 8
मुनाफ ज्या दाऊदी बोहरा समुदायाचे आहेत त्यांचे पदार्थ अतिशय छान आहेत. उदाहरणार्थ मटण समोसा, नरगिस कबाब, डब्बा गोश्त आणि कढी चावल. मुनाफ हे पदार्थ त्याच्या रेस्टॉरंटमध्ये ठेवतो. बोहरी थाल स्वादिष्ट मटण समोसा, नर्गिस कबाब, डब्बा गोश्त, कढी-चावल इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे.

6 / 8
ते कीमा समोसा आणि रान देखील बनवतात, ज्याला जास्त मागणी आहे. त्याचे रेस्टॉरंट अवघ्या एका वर्षापूर्वी सुरू झाले असून त्यांची उलाढाल 50 लाखांवर गेली आहे. मुनाफला पुढील काही वर्षांत ते 3 ते 5 कोटीपर्यंत वाढवायचे आहे.

7 / 8
गेल्या दोन वर्षात रेस्टॉरंटची उलाढाल 50 लाख रुपयांवर पोहोचली आहे. "बोहरी किचन" च्या रुचकर पदार्थांची अनेक सेलिब्रिटींनी कौतुक केले आहे. आशुतोष गोवारीकर आणि फराह खान सारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींनीही 'द बोहरी किचन'चे रुचकर पदार्थ खाण्याचा आनंद लुटला असून सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले आहे.

8 / 8
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.