ऑक्टोबर महिन्यात 11 दिवस बँका बंद राहाणार

पुढील महिन्या म्हणजेच ऑक्टोबरमध्ये बँकांचं कामकाज तब्बल 11 दिवस बंद राहणार आहे (October month bank holidays). ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती, राम नवमी, दसरा, दिवाळी, गोवर्धन पुजा आणि भाऊबीज यांसारखे सण आले आहेत.

ऑक्टोबर महिन्यात 11 दिवस बँका बंद राहाणार

मुंबई : पुढील महिन्या म्हणजेच ऑक्टोबरमध्ये बँकांचं कामकाज तब्बल 11 दिवस बंद राहणार आहे (October month bank holidays). ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती, राम नवमी, दसरा, दिवाळी, गोवर्धन पुजा आणि भाऊबीज यांसारखे सण आले आहेत. त्यामुळे बँकांना 11 दिवसांची सुट्टी असेल, ऑक्टोबर महिन्यात फक्त 21 दिवस बँका सुरु राहातील (October month 11 bank holidays).

त्यामुळे जर तुमचं बँकेचं कुठलं काम अडकून पडलं असेल, तर आधीच करुन घ्या, नाहीतर तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ऑक्टोबर महिन्यातील पहिली सुट्टी ही 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीला असेल, तर शेवटची सुट्टी ही 29 ऑक्टोबर भाऊबीजला असेल (October month bank holidays).

ऑक्टोबर महिन्यात कुठल्यादिवशी बँका बंद राहणार? 

 • 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आहे, त्यामुळे बँकेला सुट्टी असेल
 • 6 ऑक्टोबरला रविवार आहे त्यामुळे बँका बंद राहातील
 • 7 ऑक्टोबरला राम नवमी आहे, त्यामुळे बँकांना सुट्टी असेल
 • 8 ऑक्टोबरला दसरा आहे, त्यामुळे बँकांना सुट्टी असेल
 • 12 ऑक्टोबरला महिन्यातील दुसरा शनिवार आहे, त्यामुळे बँक बंद राहातील
 • 13 ऑक्टूबरला रविवार आहे, त्यामुळे बँकांना सुट्टी असेल
 • 20 ऑक्टोबरला रविवार आहे, त्यामुळे बँकेचं
 • 26 ऑक्टोबरला महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँक बंद राहातील
 • 27 ऑक्टोबरला रविवार आणि दिवाळी आहे. त्यामुळे 27 ऑक्टोबरलाही बँका बंद राहातील
 • 28 ऑक्टोबरला गोवर्धन पुजा असल्याने बँका बंद राहातील
 • 29 ऑक्टोबरला भाऊबीज असल्याने बँकेचं कामकाज बंद राहील

संबंधित बातम्या :

या 9 बँका बंद होणार असल्याचा मेसेज खोटा, आरबीआयचं स्पष्टीकरण

सलग पाच दिवस बँका बंद, नवरात्रीत ATM मध्ये पैशांचा तुटवडा?

नोटाबंदीनंतर अमित शाह आणि पंकजा मुंडेंच्या बँकेत काळा पैसा आला : सिद्धू

PMC बँकेत RBI च्या अधिकाऱ्यांचेही पैसे अडकले, आता 10 हजार रुपये काढण्याची मुभा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *