AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंगळसूत्र ते भेट मिळालेली संपत्ती; स्त्री-धनात या गोष्टींचा होतो समावेश, काय आहेत अधिकार

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस सत्तेत आली तर महिलांचे मंगळसूत्र सुद्धा ठेवणार नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील निवडणूक सभेत केला होता. या वक्तव्यावरुन विरोधकांनी पण पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, काय असते स्त्रीधन? अविवाहित महिलांचे काय असतात अधिकार?

मंगळसूत्र ते भेट मिळालेली संपत्ती; स्त्री-धनात या गोष्टींचा होतो समावेश, काय आहेत अधिकार
स्त्रीधन म्हणजे काय, काय मिळतात अधिकार
| Updated on: Apr 25, 2024 | 2:50 PM
Share

Streedhan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजस्थानमधील निवडणूक सभेतील एका वाक्यावरुन देशभरात रान पेटले आहे. पंतप्रधानांनी काँग्रेस, देशातील माय-बहिणींचे मंगळसूत्र ठेवणार नाही, अशी टीका केली होती. ते या मंगळसूत्राची किंमत किती, याचा हिशोब करतील, असे ते म्हणाले. पण तुम्हाला माहिती आहे का, स्त्री-धन काय असते? महिलांचे अधिकार काय? अविवाहित महिलांना कायद्याने संपत्तीत किती अधिकार मिळतो? राजकीय बँडबाजा व्यतिरिक्त कायदा काय सांगतो, ते पाहुयात…

पंतप्रधान काय म्हणाले

  1. राजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीत प्रचार टिपेला पोहचला आहे. यावेळी एका निवडणूक सभेत पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या एका वक्तव्याचा आधार घेतला. त्यावेळी मनमोहन सिंग यांनी देशातील संपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा असल्याचे वक्तव्य केल्याचे ते म्हणाले.
  2. त्यामुळे आता काँग्रेस जाहिरनाम्यानुसार, संपत्ती एकत्र करुन कुणाला वाटणार आहेत, असा सवाल मोदींनी केला. ज्यांची जास्त मुलं आहेत, त्यांना ही संपत्ती वाटणार का? घुसखोरांना वाटणार का? तुमच्या कष्टाचा पैसा घुसखोरांना वाटणार का? हे तुम्हाला पटतं का? असा सवाल त्यांनी केला.
  3. काँग्रेस पक्षाच्या जाहिरनाम्यात म्हटले आहे की, ते आई-बहिणींच्या सोन्याच्या हिशोब करतील. त्याची माहिती घेतील आणि पुन्हा ते वाटतील. मनमोहन सिंग यांच्या सरकारने, संपत्तीवर ज्यांचा पहिला अधिकारी आहे, असे सांगितले, त्यांना ही संपत्ती वाटण्यात येईल. हा अर्बन नक्सल विचार आहे. हे आता आई-बहिणींचे मंगळसूत्र पण ठेवणार नाहीत, अशी मोदींनी काँग्रेसवर टीका केली. त्यानंतर देशभरात एकच गोंधळ उडाला.

स्त्री-धन म्हणजे काय

स्त्री-धन ही कायदेशीर संज्ञा आहे. तिचा अर्थ होतो, महिलांचा संपत्तीवरील अधिकार. सार्वत्रिक समज असा आहे की, स्त्री-धनात त्या वस्तूंचा समावेश आहे, ज्या लग्नात स्त्रीयांना माहेरकडून देण्यात येतात. पण कायद्यात विस्तृत व्याख्या आहे. अविवाहित महिलेला सुद्धा संपत्तीत अधिकार देण्यात आला आहे. लहानपणापासून ज्या भेट वस्तू मिळतात, त्यांचा यामध्ये समावेश होतो. यामध्ये लहान-मोठे भेट वस्तू, सोने, नकद, बचत, भेट मिळालेली संपत्ती, लग्नात भेट मिळालेल्या वस्तू आणि कायद्याच्या चौकटीत येणाऱ्या वस्तूंचा, स्थावर-जंगम मालमत्तेचा यामध्ये समावेश होतो.

कोणत्या कायद्याने मिळतो अधिकार

हिंदू महिलांना स्त्रीधनाचा अधिकार, हिंदू उत्तराधिकारी अधिनियम, 1956 चे कलम 14, हिंदू विवाह अधिनियम, 1955 चे कलम 27 अंतर्गत मिळते. त्यातंर्गत लग्नापूर्वी, लग्नावेळी आणि लग्नानंतर मिळणारी भेट वस्तू आणि संपत्ती, मालमत्तेवर अधिकार मिळतो. तर घरगुती हिंसा कायदा, 2005 चे कलम 12 मध्ये महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात आले आहे. या कायद्याच्या मदतीने महिला संपत्तीवर अधिकार सांगू शकतात.

ते स्त्री-धनाचे केवळ ट्रस्टी

लग्न झाल्यावर माहेर कडून आलेल्या सर्व भेटवस्तू ,सोन्याचे दागिने हे सासरी ठेवण्यात येतात. महिला मंगळसूत्र हे स्त्रीधन म्हणून ठेऊन घेते. पण याचा अर्थ या वस्तू, मालमत्तेवर सासरकडील मंडळींचा अधिकार होत नाही. ते केवळ ट्रस्टी असतात. कायदेशीररित्या त्यावर महिलेचा अधिकार असतो.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.