NTPC Recruitment 2021 : एनटीपीसीमध्ये कार्यकारी व तज्ज्ञ पदासाठी 35 जागांवर भरती, लवकर करा अर्ज

उमेदवारांनी लक्षात घ्यावे की, या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2021 आहे. त्याचबरोबर या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण 35 पदे भरली जातील. (Recruitment for 35 posts of Executive and Expert in NTPC, apply early)

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Apr 08, 2021 | 9:09 AM

NTPC Recruitment 2021 नवी दिल्ली : एनटीपीसीमध्ये नोकरी मिळवणे ही मोठी संधी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. ( National Thermal Power Corporation Ltd.NTPC) म्हणजेच एनटीपीसीने विविध पदांसाठी भरती जारी केली आहे. त्याअंतर्गत एनटीपीसीने कार्यकारी(Executive) व तज्ज्ञांच्या(Specialist posts) पदांसाठी अर्ज मागविले आहेत. अशा परिस्थितीत, इच्छुक आणि पात्र उमेदवार एनटीपीसीची अधिकृत वेबसाइट ntpccareers.net द्वारे पोस्टसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी लक्षात घ्यावे की, या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2021 आहे. त्याचबरोबर या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण 35 पदे भरली जातील. (Recruitment for 35 posts of Executive and Expert in NTPC, apply early)

या तारखा लक्षात ठेवा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रारंभिक तारीख – 1 एप्रिल 2021 ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 15 एप्रिल 2021

भरतीचा तपशील

एनटीपीसीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कार्यकारी सुरक्षा 25, कार्यकारी आयटी डेटा सेंटरच्या, डेटा रिकव्हरीमध्ये 8 आणि वरिष्ठ कार्यकारी सोलरमधील 1 आणि स्पेशलिस्ट सौरपदाच्या 1 जागांसाठी नेमणुका करण्यात येतील. या व्यतिरिक्त, अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची गडबड होणार नाही याची काळजी उमेदवारांना घ्यावी. कोणतीही गडबड झाल्यास एनटीपीसीकडून हे पत्र नाकारले जाईल. तर, तरुणांनी हे लक्षात ठेवा.

एनटीपीसी भरती 2021: शैक्षणिक पात्रता

एनटीपीसीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या सर्व पदांसाठी उमेदवारांकडून अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, संबंधित विस्तृत तपशीलवार शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी उमेदवार अधिकृत अधिसूचनेतील तपशील तपासू शकतात.

अर्जाची फी किती?

एनटीपीसीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार जनरल / ईडब्ल्यूएस / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 300 रुपये फी भरावी लागेल. ही फी परत केली जाणार नाही. याशिवाय एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना नोंदणी फ्री आहे. उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून फी भरू शकतात. याशिवाय नियुक्ती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. (Recruitment for 35 posts of Executive and Expert in NTPC, apply early)

इतर बातम्या

LIC च्या ‘या’ योजनेत 23000 पेन्शन मिळवण्यासाठी जमा करा 3 लाख, 10 वर्षांनंतर पैसेसुद्धा परत मिळणार

पोस्टात 2850 रुपये जमा करा आणि 20 वर्षांनंतर मिळवा 14 लाख, नेमकी योजना काय?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें