चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, 100 कोटीचे हेरॉईन जप्त

सीमा शुल्क विभागानं जप्त केलेलं हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 100 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय.

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, 100 कोटीचे हेरॉईन जप्त
चेन्नई आंतराराष्ट्रीय विमानतळावर 100 कोटीचे ड्रग्ज जप्त
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 10:05 PM

चेन्नई : चेन्नईतील अण्णा आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सीमा शुल्क विभागानं आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केलीय. या कारवाईत तब्बल 15.6 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. सीमा शुल्क विभागानं जप्त केलेलं हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 100 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणात दोन विदेशी नागरिकांना अटक करण्यात आलीय. हे दोघेजण तंजानियाचे नागरिक असल्याची माहिती मिळतेय. त्यातील एक महिला आणि एक पुरुष आहे. (Drugs worth Rs 100 crore seized at Chennai airport by Border Customs Department)

सीमा शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेजण कतार एअरवेजच्या विमानाने जोहान्सबर्ग आणि दोहा मार्गे चेन्नई इथं दाखल झाले होते. अटक केलेल्या आरोपींची नावं डेबोरो एलिया (वय 46) आणि फेलिक्स ओबाडिया (वय 45) आहे. चेन्नई विमानतळावरील सीमा शुल्क आयुक्त राजन चौधरी यांनी सांगितलं की, ड्रग्सचा व्यापार वाढल्यानंतर सीमा शुल्क अधिकारी प्रत्येक वस्तूवर नजर ठेवून आहेत. आफ्रिकन देशांमधून भारतात ड्रग्सची तस्करी होत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानंतर सर्वजण अलर्टवर होते. संशय येताच दोघांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडे चौकशी केली असताना त्यांनी उडाउडवीची उत्तरं दिली.

ट्रॉली बॅगच्या खाली लपवले हेरॉईन

दोन्ही आरोपी चौकशी अधिकाऱ्यांना चकवा देत पसार होण्याच्या विचारात होते. मात्र अधिकाऱ्यांच्या सतर्कतेनं त्यांचा मनसुबा पूर्ण होऊ शकला नाही. अधिकाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी या दोघांकडील सामानाची चौकशी केली. हे दोघे प्रत्येकी 2 ट्रॉली बॅग घेऊन आले होते. बॅगच्या पृष्ठभाग प्लास्टिकने पॅक करण्यात आला होता. एका ट्रॉली बॅगमध्ये पाच प्लास्टिकचे पॅकेट ठेवण्यात आले होते, त्यात पावडर होती. जेव्हा या पावडरबाबत चौकशी केली तेव्हा ते हेरॉईन असल्याचं स्पष्ट झालं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत 100 कोटी रुपये आहे. एनडीपीएस कायद्यानुसार या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे

संबंधित बातम्या :

Chhota Rajan : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूचं वृत्त चुकीचं, एम्सचं स्पष्टीकरण

अवघ्या चार महिन्यांपूर्वी लग्न, नेमकं असं काय घडलं ‘त्याने’ पत्नीच्या हत्येची सुपारी दिली?

Drugs worth Rs 100 crore seized at Chennai airport by Border Customs Department

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.