Chiplun Crime : कामावरुन घरी आले, दुपारी जेवण उरकून झोपले ते पुन्हा उठलेच नाहीत; काय घडले नेमके?

संजय निकम याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्याने सोनाली हिच्याशी प्रेमविवाह केला होता. दोघेही मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह चालवत होते.

Chiplun Crime : कामावरुन घरी आले, दुपारी जेवण उरकून झोपले ते पुन्हा उठलेच नाहीत; काय घडले नेमके?
अज्ञात कारणातून चिपळूणमध्ये पती-पत्नीने जीवन संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 5:06 PM

चिपळूण : नेहमीप्रमाणे कामावरुन घरी परत आल्यानंतर दुपारी जेवणातून विष घेऊन जोडप्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे घडली आहे. संजय सदा निकम आणि सोनाली संजय निकम अशी आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या जोडप्याने आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. चिपळूण तालुक्यातील अलोरे चेंबरी या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

दोघांचाही प्रेमविवाह झाला होता

संजय निकम याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्याने सोनाली हिच्याशी प्रेमविवाह केला होता. दोघेही मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह चालवत होते. काल दुपारी नेमहीप्रमाणे दोघेही मजुरीचे काम करून आपल्या घरी आले होते.

जेवणातून विष घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता

घरी आल्यानंतर जेवणातून विष घेऊन ते झोपी गेले होते, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सायंकाळी घरामधील बकऱ्या चरायला घेऊन गेलेली आजी घरी परतल्यानंतर त्यांनी या दोघा नवरा-बायकोला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

परंतु ते कोणताच प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावलं. यावेळी पती-पत्नी मयत असल्याचं कळलं. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांकडून सदर घटनेचा तपास सुरू झाला आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप अनभिज्ञ

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी कामथे रुग्णालयात पाठवले. दरम्यान, या पती-पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आत्महत्या प्रकरणाची चौकशी रत्नागिरी पोलीस करीत आहेत.

दररोज मजुरीला जायचं. रोजच्या रोज पैसे कमवायचे आणि उदरनिर्वाह चालवायचा असा रोजचाच निकम परिवाराचा दिनक्रम होता. काल दुपारी पती-पत्नीच्या बाबत जे घडलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.