मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, साहिल खानचा जॅकी श्रॉफच्या बायकोशी काय वाद होता?

प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयेशा श्रॉफ (Ayesha Shroff) हिचे साहिलसोबत प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा काही वर्षांपूर्वी उडाल्या होत्या. मात्र आयेशाने त्या धुडकावून लावल्याच, मात्र साहिल खान गे म्हणजेच समलिंगी असल्याचा दावा केला होता.

मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, साहिल खानचा जॅकी श्रॉफच्या बायकोशी काय वाद होता?
मनोज पाटील (डावीकडे), साहिल खान (मध्यभागी) जॅकी -आयेशा श्रॉफ (उजवीकडे)

मुंबई : मिस्टर इंडिया मनोज पाटील (Mr India Manoj Patil) याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विषारी गोळ्या खाऊन 29 वर्षीय मनोजने आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. बुधवारी रात्री उशिरा कुटुंबियांनी त्याला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केलं. सध्या मनोजची तब्येत स्थिर असल्याची माहिती आहे. बॉलिवूड अभिनेता साहिल खान (Sahil Khan) याच्या त्रासाला कंटाळून मनोज पाटीलने हे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कोण आहे साहिल खान?

साहिल खान एक बॉलिवूड चित्रपट अभिनेता, फिटनेस उद्योजक आणि यूट्यूबर आहे. फिटनेस जागरूकता वाढवण्यासाठी तो ओळखला जातो. साहिल खान आणि वाद हे समीकरण नवीन नाही. प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयेशा श्रॉफ (Ayesha Shroff) हिचे साहिलसोबत प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा काही वर्षांपूर्वी उडाल्या होत्या. मात्र आयेशाने त्या धुडकावून लावल्याच, मात्र साहिल खान गे म्हणजेच समलिंगी असल्याचा दावा केला होता.

काय आहे प्रकरण?

2014 मध्ये, आयेशा आणि साहिल खान यांच्या कथित प्रेम प्रकरणाच्या बातम्या छापून आल्या होत्या. आयेशाने तेव्हा साहिल खानविरुद्ध फसवणूक केल्याचा आरोप केला होता आणि आपल्याकडून घेतलेले 8 कोटी रुपये परत न केल्याचंही म्हटलं होतं. त्याचप्रमाणे आपली प्रतिष्ठा मलीन केल्याबद्दल तिने त्याच्याविरुद्ध मानहानीचा दावाही दाखल केला होता.

याची सुरुवात 2009 मध्ये झाली, जेव्हा आयशा श्रॉफ आणि साहिल खान यांनी भागीदारीत एक प्रॉडक्शन कंपनी सुरु केली. त्यावेळी पत्नी निगार खानपासून (Negar Khan) विभक्त झालेला साहिल खान आयेशासोबत डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. साहिल आयेशापेक्षा वयाने 17 वर्षांनी लहान आहे. मात्र त्यांचे कथित प्रेमप्रकरण फार काळ टिकले नाही.

साहिल खानकडून अफेअरच्या चर्चांना दुजोरा

साहिलने दोघांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांना दुजोरा दिला होता, तर आयेशाने सर्व दावे फेटाळून लावले होते. “माझ्याशी संबंध तोडल्यानंतर आता आयेशा मला भेटवस्तू परत देण्यास सांगत आहे आणि आम्ही एकत्र घालवलेल्या ट्रिपवर तिने केलेला खर्च परत मागत आहे” असं साहिलने सांगितलं होतं. त्यानंतर आयेशाने साहिल खानविरुद्ध फसवणुकीची तक्रार केली आणि त्याने 8 कोटी रुपये परत न केल्याचा दावा ठोकला.

आयेशाचे आरोप काय होते?

“साहिल खानचा दावा आहे की, मी त्याच्यासोबत व्हेकेशनवर होते, हे माझ्या कुटुंबापासून लपवण्यासाठी मी कंपनीच्या खात्याद्वारे त्याला पैसे दिले. सर्व देयके माझ्या वैयक्तिक खात्यातून थेट त्याच्या खात्यात जमा केली गेली. हा निधी माझ्या पतीचा आहे. आणि आम्ही दोघे एकाच चार्टर्ड अकाऊंटंटकडे व्यवहार करतो. त्यामुळे माझ्या कुटुंबापासून काहीही लपवण्याचा प्रश्न उद्भवत नाही.”

साहिल खानला दिलासा

दरम्यान, अभिनेता साहिल खानला नुकताच मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला. साहिल आणि आयेशा श्रॉफ यांनी वाद सामंजस्याने मिटवला.
साहिल विरोधात दाखल दोन गुन्हे रद्द करण्यात आले, मात्र हायकोर्टाने 1 लाख रुपयांचा दंड त्याला ठोठावला आहे. दंडाची रक्कम बाल कल्याण निधीत जमा करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत

साहिल गे असल्याचे आरोप

साहिल खानसोबत कथित विवाहबाह्य संबंधांच्या आरोपांचेही आयशाने खंडन केले होते. मी त्याच्याशी रिलेशनशीपमध्ये कशी राहू शकते. साहिलची (घटस्फोटित) पत्नी निगार खानने त्याला “तो समलिंगी असल्यामुळे घटस्फोट दिला होता” तिने त्याला एका पुरुष कर्मचाऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवताना पाहिले होते, असा दावाही आयेशाने केला होता.

घटस्फोटित पत्नीचाही दावा

निगार खानने जुलै 2005 मध्ये एका मुलाखतीत म्हटले होते “जेव्हा साहिल माझ्या चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त बँकॉकमध्ये आला होता, तेव्हा तिथे धक्कादायक प्रकार घडला होता. त्याला वाटलं की मी दिवसभर शूटिंगसाठी बाहेर असेन, पण मी लवकर आले आणि साहिलला एका पुरुषासोबत नको त्या अवस्थेत पाहून मला प्रचंड धक्का बसला होता”

साहिल खानने आरोप फेटाळले

दरम्यान, साहिल खानने आपण गे असल्याचे आरोप फेटाळले होते. साहिल खान आणि निगार खान यांचा 2004 मध्ये विवाह झाला होता. मात्र वर्षभरातच, म्हणजे 2005 मध्ये ते विभक्त झाले. डबल क्रॉस एक धोका या सिनेमात निगार आणि साहिल यांनी एकत्र काम केलं होतं.

संबंधित बातम्या :

बायकोसोबत बेबनावाचा फायदा घेत साहिल खान मला केसमध्ये अडकवतोय, मिस्टर इंडिया मनोज पाटीलच्या पत्रातील आरोप वाचा जसेच्या तसे

‘स्टाईल’ चित्रपटातून मिळवली प्रसिद्धी, आता मनोरंजन विश्वापासून दूर राहून ‘हे’ काम करतोय साहिल खान!

Manoj Patil | अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतो, मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI