बुलडाण्यात डोंगर पायथ्याशी 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह, जवळ दारुची बाटली, गुलाबाचे फूल आणि ब्लाऊज

मृतदेहाजवळ दारुची छोटी बॉटल, एक गुलाबाचे फूल, ब्लाऊज आणि एक अगरबत्तीचा पुडाही आढळून आल्याने ही घटना घातपात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

बुलडाण्यात डोंगर पायथ्याशी 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह, जवळ दारुची बाटली, गुलाबाचे फूल आणि ब्लाऊज
बुलडाण्यात डोंगराच्या पायाशी तरुणाचा मृतदेह
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 11:24 AM

बुलडाणा : बुलडाण्यात डोंगराच्या पायथ्याशी एका 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. तरुणाच्या शरीरावर रक्ताचे डाग असल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. आहे. मृतदेहाजवळ दारुची छोटी बॉटल, एक गुलाबाचे फूल, ब्लाऊज आणि एक अगरबत्तीचा पुडाही आढळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

काय आहे प्रकरण?

बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव तालुक्यातील गारडगाव शिवारातील डोंगराच्या पायथ्याशी 32 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह गावातील नागरिकांना आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संतोष टवरे (रा. एकलारा बानोदा, तालुका संग्रामपूर) असे मृत तरुणाचे नाव असल्याचे त्याच्याजवळ मिळालेल्या आधार कार्डावरुन समजले आहे.

मृतदेहाजवळ गुलाब, ब्लाऊजही

मृतदेहाजवळ दारुची छोटी बॉटल, एक गुलाबाचे फूल, ब्लाऊज आणि एक अगरबत्तीचा पुडाही आढळून आल्याने ही घटना घातपात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

मृतदेह कसा सापडला

खामगाव तालुक्यातील गारडगाव शिवारात डोंगराळ भाग असून या ठिकाणी दुपारी शेतकरी आपल्या शेतात गेले होते. तेव्हा तिथे 32 वर्षीय तरुण मृतावस्थेत आढळला. याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला.

आत्महत्या की घातपात?

यावेळी घटनास्थळाची पाहणी केली असता मृतदेहापासून काही अंतरावर चप्पल, दारुची एक छोटी बॉटल, एक गुलाबाचे फूल, ब्लाऊज आणि उदबत्तीचा एक पुडा असे साहित्य आढळून आल्याने तेही पोलिसांनी घटनास्थळावरुन जप्त केले. तर यावेळी आधार कार्ड मिळून आल्याने यावरुन मयत तरुणाचे नाव संतोष टवरे असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र ही घटना आत्महत्या आहे की घातपात? याविषयी अद्याप स्पष्टता नाही.

नंदुरबारमध्ये युवतीच्या मृतदेहाचे गूढ उकलले

दुसरीकडे, नंदुरबार परिसरातील बिलाडी शिवारात रेल्वे रुळाजवळ सापडलेल्या युवतीच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधाराने हत्या प्रकरणातील आरोपीला गुजरात राज्यातून अटक करण्यात आली आहे. एका अनोळखी महिलेचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र लग्नाचा तगादा लावल्यानेच तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

सीसीटीव्हीमध्ये प्रेमी युगुल कैद

कुठलाही पुरावा नसल्याने अनोळखी मृतदेहाचा तपास लावण्याचं एक मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. मात्र पोलिसांनी पाचोराबारी येथील रेल्वे फाटकाजवळ राहणारे कल्पेशभाई पटेल यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेराची तपासणी केली. त्यावेळी एक तरुण आणि एक तरुणी सुरतच्या दिशेने येऊन नंदुरबारच्या दिशेने जाताना दिसली होती.

सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेल्या तरुणीच्या अंगावर असलेले कपडे हे मृतदेहाच्या अंगावर आढळलेल्या कपड्याच्या वर्णनाशी जुळून आले. त्यासाठी पोलिसांच्या एक टीमने सुरतला जाऊन तपासणी केली असता, हत्या प्रकरणाचे सर्व धागेदोरे हाती लागले.

लग्नाचा तगादा लावल्याने हत्या

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली. आमचं फोनवरून प्रेम झालं होतं, मात्र ती वारंवार लग्नासाठी मागे लागत असल्यामुळे त्याच रागातून हत्या झाल्याचा दावा आरोपीने केला. मुलगी बिहारच्या छपरा येथील, तर आरोपी तरुण सिवनचा रहिवासी आहे.

संबंधित बातम्या :

मंदिरात जाताना पहाटे धारदार शस्त्राने हत्या, विरारच्या बिल्डरच्या हत्येचं गूढ उलगडलं

मायलेकीसह अल्पवयीन मुलगा राहत्या घरी मृतावस्थेत, मीरा रोडमध्ये खळबळ

लक्स कोझीच्या मालकाला मान्य नव्हतं लेकीचं प्रेम, जावई आढळलेला रेल्वे रुळाजवळ मृतावस्थेत

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.