Photo | नातीच्या मांडवात घराला आग; भिंत खचली, चूल विझली, संसार खाक…!

उमेश पारीक

| Edited By: |

Updated on: Feb 17, 2022 | 5:11 PM

नाशिक जिल्ह्यातल्या लग्नघरात गुरुवारी, 17 फेब्रुवारी रोजी आग लागल्याची घटना घटली. निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे सूर्यभान पांडुरंग जीवरक यांच्या नातीचे लग्न घरासमोर सुरू होते. मात्र, घराला अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले. गावकऱ्यांनी फोन करताच 'एचएल' व पिंपळगाव बसवंत येथील अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यांनी आटोकाट प्रयत्न करून आग विझवली. मात्र, तोपर्यंत घरातील मौल्यवान वस्तू व संसार जळून खाक झाला. आगीचे कारण अजून समजले नाही. या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

Feb 17, 2022 | 5:11 PM
निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे लग्न सुरू असताना घराला आग लागली. अन् बघता-बघता सारे भस्म झाले.

निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे लग्न सुरू असताना घराला आग लागली. अन् बघता-बघता सारे भस्म झाले.

1 / 6
आगीने इतके रौद्र रूप धारण केले की, घरात काय सुरू आहे समजत नव्हते. त्यामुळे काही क्षणात घराची राख झाली.

आगीने इतके रौद्र रूप धारण केले की, घरात काय सुरू आहे समजत नव्हते. त्यामुळे काही क्षणात घराची राख झाली.

2 / 6
आगीमध्ये घराचा पहिला आणि दुसरा मजला जळून खाक झाला. शिवाय छप्परही जळाले. त्यामुळे निवारा उडाला.

आगीमध्ये घराचा पहिला आणि दुसरा मजला जळून खाक झाला. शिवाय छप्परही जळाले. त्यामुळे निवारा उडाला.

3 / 6
एकीकडे मुलीच्या डोक्यावर अक्षता पडता होत्या, दुसरीकडे घर पेटले. यामुळे वऱ्हाडी मंडळींनी हलकल्लोळ केला.

एकीकडे मुलीच्या डोक्यावर अक्षता पडता होत्या, दुसरीकडे घर पेटले. यामुळे वऱ्हाडी मंडळींनी हलकल्लोळ केला.

4 / 6
ऐन नातीच्या लग्नादिवशीच आजोबाचे घर जळून गेल्याने गावकरी आणि नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

ऐन नातीच्या लग्नादिवशीच आजोबाचे घर जळून गेल्याने गावकरी आणि नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

5 / 6
आग लागल्याचे समजताच लग्नातील फोटोग्राफरसह वऱ्हाडी मंडळींनी घरातील सामान काढण्यासाठी मदत केली.

आग लागल्याचे समजताच लग्नातील फोटोग्राफरसह वऱ्हाडी मंडळींनी घरातील सामान काढण्यासाठी मदत केली.

6 / 6

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI