सोन्याच्या दागिन्यांसाठी कोयत्याने वार, हात तुटला; तृतीयपंथी गंभीर जखमी

prajwal dhage

| Edited By: |

Updated on: May 21, 2021 | 11:40 AM

नाशिक शहरातील पंचवटी परिसरात एका तृतीयपंथीयावर जीवघेणा हल्ला झाला आहे. (nashik third gender attack)

सोन्याच्या दागिन्यांसाठी कोयत्याने वार, हात तुटला; तृतीयपंथी गंभीर जखमी
NASHIK CRIME
Follow us

नाशिक : शहरातील पंचवटी परिसरात एका तृतीयपंथीयावर (third gender) जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. या भीषण घटनेमुळे सध्या पंचवटी परिसरात तणावाचं वातवरण आहे. या घटनेत तृतीयपंथीयाचा चक्क तुटला असून त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. हल्लेखोराचा पोलीस शोध घेत आहेत. (Nashik third gender seriously injured in attack of unknown person)

नेमका प्रकार काय ?

मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमधील पंचवटी बाजारपेठेमध्ये एका तरुणाने अचानकपणे एका तृतीयपंथीयावर हल्ला केला. हा हल्ला काही सधारण नव्हता. तर यामध्ये तृतीयपंथीयवर थेट कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात तृतीयपंथीयाचा एक हात पूर्णपणे तुटला आहे. तसेच अंगावर इतर ठिकाणी वार केल्यामुळे तृतीयपंथी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्यालासुद्धा गंभीर ईजा झाली आहे.

सोन्याचे दागीने तसेच रोकड हिसकावली

मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला पूर्ववैमनस्यातून करण्यात आला नसून त्यामागे लूट करण्याचा हेतू असावा. या हल्ल्यामध्ये तृतीयपंथीयाकडून हल्लेखोराने सोन्याचे दागिने हिसकाऊन घेतले आहेत. तसेच त्याच्याकडील काही रोकडसुद्धा अज्ञात तरुणाने लांबवली आहे.

आरोपीचा शोध सुरु

दरम्यान, या भयानक हल्ल्यामुळे पंचवटी परिसरात सध्या तणावाचे वातावरण असून हल्लेखोर तरुण फरार आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

आईच्या मृत्यूमुळे मुलीची आत्महत्या

आईच्या मृत्यूने व्यथित झालेल्या मुलीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना 5 मे रोजी नाशिकमध्ये घडली. कोरोनाची लागण झाल्यानंतर ऑक्सिजन बेड न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेचं नाव जया भुजबळ असं होतं. त्यानंतर याच महिलेच्या मुलीने सॅनिटायझर पिऊन आयुष्य संपवलं होतं. या प्ररणामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली होती.

इतर बातम्या :

तीन मुलींसोबत आईने स्वत:लाही संपवलं, दोघी बचावल्या, रेल्वेखाली येण्याचं नेमकं कारण काय ?

पहिल्या पत्नीपासून एक मुलगा, दुसऱ्या पत्नीसोबतही वाद, मध्यरात्री हत्या करुन पोलीस ठाण्यात दाखल, आरोपी पतीने असं का केलं?

VIDEO | Neha Kakkar ची पतीसोबत जोरदार हाणामारी, एकमेकांचे गळे पकडले, झिंज्या उपटल्या

(Nashik third gender seriously injured in attack of unknown person)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI