डरकाळी ठाकरेंचीच… मुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुकीत युवासेनेची क्लीन स्वीप; विरोधकांची एकही सीट…

आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठातील आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने सिनेटच्या निवडणुकीत 10 पैकी 10 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठातही डरकाळी ठाकरे गटाचीच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

डरकाळी ठाकरेंचीच... मुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुकीत युवासेनेची क्लीन स्वीप; विरोधकांची एकही सीट...
aditya thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 28, 2024 | 12:03 AM

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीच्या दहाही जागांचे निकाल हाती आले आहेत. या दहाही जागांवर ठाकरेंच्या युवा सेनेने दणदणीत आणि खणखणीत विजय मिळवला आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने सिनेट निवडणुकीत क्लीन स्वीप करून पुन्हा एकदा विद्यापीठावर आपलाच दबदबा असल्याचं दाखवून दिलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटाला अत्यंत प्रतिष्ठेच्या विद्यापीठाच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत उत्साह संचारला आहे.

आज मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. पहिल्या निकालापासूनच ठाकरेंची युवा सेना आघाडीवर होती. दहाव्या जागेचा निकाल रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी आला. युवा सेनेने 10 पैकी 9 जागा जिंकल्यानंतर दहावी जागा तरी आपल्या वाट्याला येते का? याकडे विरोधकांचं लक्ष होतं. पण व्यवस्थित नियोजन, विश्वासहार्यता आणि केलेल्या कामाची पोचपावती म्हणून पदवीधर मतदारांनी युवासेनेच्या बाजूनेच दहाव्या जागेचाही कौल दिला आणि विरोधकांचा सुपडा साफ झाला.

पुन्हा पुनरावृत्ती

शेवटच्या दोन फेऱ्यानंतर युवासेनेने दहावी जागा जिंकली. युवा सेनेचे किसन सावंत हे विजयी झाले. ही दहावी जागा जिंकल्याने युवासेनेने 2018 च्या मुंबई सिनेट निवडणुकीची पुनरावृत्ती केली आहे. 2018मध्येही युवासेनेने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात 10 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीतही पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर युवा सेनेने पूर्णपणे वर्चस्व दाखवेल आहे.

हे उमेदवार जिंकले

युवा सेनेचे मयूर पांचाळ यांना 5350 मते मिळाली आहेत. पांचाळ यांनी अभाविपचे उमेदवार राकेश भुजबळ यांचा पराभव केला आहे. भुजबळ यांना केवळ 888 मते मिळाली. तर युवासेनेच्या स्नेहा गवळी यांना 5914 मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रेणूका ठाकूर यांना केवळ 893 मते मिळाली.

शीतल शेठ देवरुखकर यांना 5489 मते मिळाली. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उमेदवार राजेंद्र सायगावकर यांचा पराभव केला. सायगावकर यांना 1014 मते मिळाली. युवा सेनेच्या धनराज कोहचडे यांना 5247 मते मिळाली आहेत. अभाविपच्या निशा सावरा यांचा त्यांनी पराभव केला. निशा यांना केवळ 924 मते मिळाली. युवासेनेचे शशिकांत झोरे यांना 5170 मते मिळाली आहे. त्यांनी अभाविपचे उमेदवार अजिंक्य जाधव यांचा पराभव केला आहे. अजिंक्य यांना 1066 मते मिळाली.

युवासेनेचे प्रदीप सावंत हे खुल्या प्रवर्गातून हे खुल्या प्रवर्गातून विजयी झाले आहेत. त्यांना पहिल्या पसंतीचे 1338 हून अधिक मते मिळाली आहेत. सलग तिसऱ्यांदा विजयी होण्याची हॅट्ट्रीक त्यांनी साधली आहे. युवासेनेचे उमेदवार मिलिंद साटम, परम यादव आणि किसन सावंत हे विजयी झाले आहेत. अल्पेश भोईर हे 1137 मते मिळवून विजयी झाले आहेत.

जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...