पॉलिटेक्निकसाठी सीईटी परीक्षा न घेता दहावीच्या गुणांनुसार प्रवेश, उदय सामंत यांची माहिती

इयत्ता दहावीनंतर कोणतीही सीईटी परीक्षा न घेता पॉलिटेक्निकसाठी थेट प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (polytechnic admission 2021 uday samant)

पॉलिटेक्निकसाठी सीईटी परीक्षा न घेता दहावीच्या गुणांनुसार प्रवेश, उदय सामंत यांची माहिती
उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 11:09 PM

सांगली : इयत्ता दहावीनंतर कोणतीही सीईटी परीक्षा न घेता पॉलिटेक्निकसाठी थेट प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली. मात्र दुसर्‍या बाजूला इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक शिक्षणासाठी सीईटी परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आगामी काळात ही सीईटी घेतली जाईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले. (Polytechnic admission 2021 will be on 10th class marks said Uday Samant)

पॉलिटेक्निकसाठी प्रवेशी परीक्षा नाही

उदय सामंत आज (7 जून) सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. यावेळी सामंत यांनी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया आणि इतर बाबींवर भाष्य केले. “दहावीनंतर विद्यार्थ्यांचे गुण आणि निकाल प्रमाणपत्र पाहून त्यांना पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश दिला जाईल. तसेच यावेळी या विद्यार्थ्यांची कोणतीही प्रवेश परीक्षा होणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

प्रोफेशनल कोर्सेसाठी सीईटी होईल

तसेच पुढे बोलताना त्यांना राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवरही भाष्य केले. “प्रोफेशनल कोर्सेससाठी सीईटी होईल. त्यासाठी आगामी काळात निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांची सुरक्षितता समोर ठेऊनच हा निर्णय होईल,” असे सामंत म्हणाले.

बीए, बी कॉमसाठी प्रवेश परीक्षा असा कोणताही निर्णय नाही

दरम्यान, त्यांनी सध्या राज्यात पसरत असलेल्या अनेक अफवांवर बोट ठेवले. सध्या बीए, बीकॉम या तसेच इतर विद्याशाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठीसुद्धा प्रवेश परीक्षा होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, तसा कोणताही निर्णय घेतलेला नाही. बारावी वर्गाचा निकाल हाती आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आल्यानंतर प्रवेश प्रक्रियेवर विचार करण्यात येईल, असे सामंत म्हणाले. तसेच कोरोनाकाळात विद्यार्थ्यांना जी प्रमाणपत्रं मिळणार आहेत; त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी सांगीतले.

Video | Uday Samant | नाणार प्रकल्प होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ : उदय सामंत @samant_uday #UdaySamant #NanarProject #Ratnagiri pic.twitter.com/mcRXXErohz

इतर बातम्या :

प्रथम वर्ष प्रवेशाचा निर्णय कधी, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री म्हणतात…

NEET सह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा रद्द करा, नरेंद्र मोदींकडे मुख्यमंत्र्यांनंतर विरोधी पक्षाच्या नेत्याची मागणी

NCC : देशातील 91 विद्यापीठांकडून राष्ट्रीय छात्र सेनेचा अभ्यासक्रमात समावेश, यूजीसीच्या पत्राला मोठा प्रतिसाद

(Polytechnic admission 2021 will be on 10th class marks said Uday Samant)

Non Stop LIVE Update
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्.