सत्ता जाताच नवज्योत सिंग सिद्धूंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

सत्ता जाताच नवज्योत सिंग सिद्धूंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

| Updated on: Mar 16, 2022 | 1:33 PM

पंजाबमधील सत्ता जाताच काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

पंजाबमधील सत्ता जाताच काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाचही राज्यातील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मागितले होते. त्यानुसार सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. हायकमांडच्या इच्छेनुसारच राजीनामा देत असल्याचं सिद्धू यांनी म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितलं होतं. प्रदेश कमिट्यांचे पुनर्गठन करण्यासाठी हे राजीनामा मागण्यात आल्याचं ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलं होतं. त्यामुळे आता उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडच्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचेही राजीनामे एक दोन दिवसात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Published on: Mar 16, 2022 01:33 PM