AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election Result 2025: बडे बेआबरू होकर…MIM ने राष्ट्रीय पक्षाला पण टाकले मागे, इतक्या जागांवर काँग्रेस आघाडीवर

AIMIM lead in Bihar Election 2025: बिहार निवडणुकीतील निकालाने काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. बिहारमध्ये काँग्रेसने मित्रांना पण झटका दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. काँग्रेस परजीवी झाल्याचा चिमटा बिहारमध्ये सत्ताधारी काढत आहेत.

Bihar Election Result 2025: बडे बेआबरू होकर...MIM ने राष्ट्रीय पक्षाला पण टाकले मागे, इतक्या जागांवर काँग्रेस आघाडीवर
अससुद्दीन ओवेसी एमआयएम, राहुल गांधी काँग्रेस
| Updated on: Nov 14, 2025 | 1:54 PM
Share

Congress Poor Performance Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वात खराब प्रदर्शन काँग्रेसचे आहे. काँग्रेसने 61 जागांवर निवडणूक लढवली. त्यातील 4 जागांवरच पक्षाला आघाडी घेता आली आहे. तर गेल्यावर्षी बिहारमध्ये काँग्रेसचे 19 आमदार होते. काँग्रेस बिहारमध्ये सुद्धा रसातळाला गेल्याचे समोर येत आहे. बडे बेआबरू होकर तेरे कूचे से हम निकले अशी म्हणण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. कारण ऑल इंडिया इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) या पक्षाने काँग्रेसला मागे टाकल्याचे समोर येत आहे.

काँग्रेसने महाआघाडीलाही बुडवले?

सध्या कल ज्याप्रमाणे समोर येत आहे. त्यावरून काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचे समोर येत आहे. या निवडणुकीत काँग्रेसने आरजेडीसह महाआघाडी केली होती. आरजेडीला 150 जागा देण्यात आल्या होत्या. तर काँग्रेस 61 जागांवर लढत होती. यावेळी राहुल गांधी यांनी बिहारच्या निवडणुकीत वोटचोरी आणि इतर मुद्यांवर जोरदार प्रचार केला. तेजस्वी यादव यांच्या सभांना पण मोठी गर्दी उसळली. पण त्याचे मतात परिवर्तन होऊ शकले नाही. बिहारमध्ये काँग्रेसचा जनाधारच हरवल्याचे दिसून आले. सुरुवातीला राहुल गांधी यांनी प्रचारात जान फुंकली. पण नंतर ते जसे बाजूला हटले. तसा फटका बसल्याचा दावा करण्यात येत आहे. पण इतकी सुमार कामगिरी एखादा राष्ट्रीय पक्ष करत असेल तर या पक्षाला मोठ्या बदलाची गरज असल्याचा चिमटा आता सत्ताधारी काढत आहेत.

AIMIM काँग्रेसवर भारी

बिहारमध्ये मुस्लीम लोकसंख्या जवळपास 17.7 टक्के इतकी आहे. अनेक जागांवर मुस्लीम मतदारांचा प्रभाव दिसून आला. एनडीएने यंदा चार मुस्लीम उमेदवारांना तिकीट दिले होते. ते सुद्धा आघाडीवर दिसत आहेत. तर किशनगंजपासून ते दरभंगापर्यंत अनेक मतदारसंघात मुस्लीम मतदार निर्णायक भूमिका बजावतात. यामध्ये नरकटियागंज,बेतिया, सिकटा, सुगौली, नरकटिया, ढाका, परिहार, बाजपट्टी, बिस्फी, मधुबनी, रानीगंज, फोर्बेसंगज, अररिया, जोकीहाट, सिकटी, ठाकूरगंज, किशनगंज, कोचाधामन, बैसी, कस्बा, पूर्णिया, कटिहार, कदवा, बलरामपूर, प्राणपूर, मनिहारी, बरारी, कोरहा, गौरा बौराम, दरभंगा ग्रामीण, दरभंगा, केवटी, जाले, सिवान, रघुनाथपूर, बडहरिया आणि भागलपूर या सारख्या मतदार संघाचा समावेश आहे.

सध्याच्या आकडेवारीनुसार, AIMIM बहादुरगंज, कोचाधामन, अमौर, बैसी आणि बलरामपूर या पाच जागांवर आघाडीवर आहे. या सर्व जागा किशनगंज, अररिया आणि जवळपासच्या जिल्ह्यांतील आहेत. येथे ओवेसी यांच्या पक्षाला गेल्या काही वर्षांत चांगले यश मिळताना दिसत आहे. धार्मिक ध्रुवीकरण करण्यात येते एमआयएमला यश आल्याचा आरोप होत आहे. तर काँग्रेसपेक्षा बिहारमध्ये एमआयएम वरचढ दिसत आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.