AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lok Sabha Exit Poll 2024 : भाजपचा तर इथं सुपडा होईल साफ, विरोधकांच्या दाव्यातील एक्झिट पोलने काढली हवा, मोदी मॅजिकचा दिसेल परिणाम

टीव्ही 9-People's Insight आणि POLSTRAT च्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला केवळ उत्तर भारतातूनच नाही तर दक्षिण भारत पण आघाडी देईल. तामिळनाडूतील 39 लोकसभा जागांपैकी 35 जागा इंडिया आघाडीच्या खात्यात जातील. दक्षिणेतील अनेक ठिकाणी सुरुंग लावण्यात भाजप यशस्वी होईल.

Lok Sabha Exit Poll 2024 : भाजपचा तर इथं सुपडा होईल साफ, विरोधकांच्या दाव्यातील एक्झिट पोलने काढली हवा, मोदी मॅजिकचा दिसेल परिणाम
Lok Sabha Exit Poll 2024
| Updated on: Jun 02, 2024 | 10:40 AM
Share

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपने दक्षिण मशीन राबवले. दक्षिणेत कर्नाटक व्यतिरिक्त तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि इतर ठिकाणी त्यांनी लक्ष केंद्रीत केले होते. इंडिया आघाडीला दक्षिण भारत मोठ्या संख्येने त्यांच्या बाजूला उभा राहण्याची आशा आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी येईल. पण त्यापूर्वी एक्झिट पोलने त्यांच्या आशेवर पाणी फिरवले आहे. दक्षिण राज्यात पण मोदी फॅक्टर महत्वाचे ठरल्याचे दिसून येते.

TV9-People’s Insight आणि POLSTRAT च्या एक्झिट पोलनुसार, उत्तर भारतच नाही तर दक्षिण भारतात पण भाजपने राजकीय जमीन चांगलीच कसली. त्याचा फायदा दिसू शकतो. दक्षिणेतील राज्यात लोकसभेच्या एकूण 131 जागा आहेत. त्यामध्ये कर्नाटक 28, तेलंगणा 17, आंध्र प्रदेशमध्ये 25, तामिळनाडूमध्ये 39, केरळमध्ये 20, पुद्दुचेरी आणि लक्षद्वीपमध्ये 1-1 जागा आहेत. या भागात भाजप नेतृत्वातील एनडीएला 44 जागा मिळण्याचा अंदाज आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा हा आकडा अधिक आहे.

कर्नाटकाविषयी काय भाकीत?

कर्नाटक राज्यात एकूण 28 लोकसभा जागा आहेत. टीव्ही 9 People’s Insight आणि POLSTRAT च्या एक्झिट पोलनुसार, यातील 18 जागांवर भाजप दिमाखात पुढे येईल. भाजपला 2019 मधील लोकसभेतील जागांपेक्षा सात जागांवर फटका बसण्याची शक्यता आहे. पण दक्षिणेतील इतर राज्यात ही कसर भरुन निघण्याची शक्यता आहे.

तेलंगणाचे गणित काय?

Exit Poll Serve नुसार तेलंगणातील 17 जागांपैकी भाजप 7 जागा खेचून आणेल. तर काँग्रेसच्या पारड्यात 8 जागा असतील. बीआरएसला एका जागेवर विजय मिळेल. एक जागा AIMIM जिंकेल. सर्वाधिक फटका केसीआर यांच्या बीआरएसला बसू शकतो. तर काँग्रेस, भाजपला मोठा फायदा होईल. गेल्या लोकसभेवेळी भाजपने तेलंगणात 4 जागा मिळवल्या होत्या. आता त्यांच्या झोळीत अजून तीन जागा पडणार आहेत.

तामिळनाडूत भाजपचे खाते उघडणार

तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागा आहेत. त्यातील 35 जागा इंडिया आघाडीच्या खात्यात जमा होतील. तर एनडीएला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. AIADMK समोर मोठी नामुष्की आहे, त्यांना एकही जाग मिळण्याची शक्यता नाही. इंडिया आघाडीत काँग्रेसला 8, डीएमकेला 21, डाव्यांना 4, ओपीएसला एक, एमडीएमकेला 1 आणि व्हीसीके यांना एक जागा मिळेल. लोकसभा 2019 मध्ये भाजपचे खाते उघडले नव्हते. यावेळी भाजपला दोन जागा तर एनडीएला चार जागा मिळण्याचा अंदाज आहे.

केरळमध्ये भाजपची काय स्थिती?

केरळमध्ये लोकसभेच्या 20 जागा आहेत. एक्झिट पोलनुसार, केरळमध्ये भाजपला एक जागा मिळेल. काँग्रेस नेतृत्वातील युडीएफला 16 जागा तर एलडीएफ या डाव्या विचारी पक्षांना 3 जागा मिळतील. युडीएफमध्ये काँग्रेस 13 जागा, इंडियन युनियन मुस्लीम लीग 2, केईसीला एक जागा मिळेल. गेल्या लोकसभेला तामिळनाडू प्रमाणेच केरळमध्ये भाजपचे खाते उघडले नव्हते.

आंध्र प्रदेश कुणासोबत जाणार

एक्झिट पोलनुसार, आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या 25 जागा आहेत. त्यातील 12 जागांवर एनडीए मुसंडी मारेल. तर इंडिया आघाडीसाठी वाईट बातमी आहे. त्यांचे खाते सुद्धा उघडणार नाही. वायएसआर काँग्रेसला 13 जागा मिळण्याचा अंदाज आहे. एनडीएच्या 12 जागांपैकी भाजपला 2, टीडीपीला 9 आणि जेएसपीच्या खात्या एक जागा जाण्याचा अंदाज आहे. वायएसआर काँग्रेसला यंदा 10 जागांवर फटका बसण्याचा अंदाज आहे. गेल्यावेळी आंध्र प्रदेशात सुद्धा भाजपचे खाते उघडले नाही.

असा होऊ शकतो फायदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण भारतावर लक्ष केंद्रीत केले होते. गेल्या लोकसभेत त्यांची जादू चालली नव्हती. तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेशात त्यांना खाते सुद्धा उघडता आले नाही. त्यानंतर भाजपने या भागावर विशेष लक्ष दिले. दक्षिणेतील एकूण 131 जागांपैकी गेल्यावेळी भाजपला 29 ठिकाणी विजय मिळाला होता. तर काँग्रेस 27 जागांवर आणि प्रादेशिक पक्षांना 74 जागा मिळाल्या होत्या. यंदा एनडीएला 44 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.